News Flash

पालघर नगरपरिषद निवडणूक प्रक्रियेस सुरुवात

पालघर नगर परिषदेची मुदत एप्रिल २०१९ मध्ये संपत असून त्याअनुषंगाने प्रभाग रचना, आरक्षण सोडतीबाबतची प्रक्रिया सुरू झाली आहे.

पालघर नगरपरिषद निवडणूक प्रक्रियेस सुरुवात
(संग्रहित छायाचित्र)

पालघर नगर परिषदेची मुदत एप्रिल २०१९ मध्ये संपत असून त्याअनुषंगाने प्रभाग रचना, आरक्षण सोडतीबाबतची प्रक्रिया सुरू झाली आहे. याबाबतचे निर्देश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत. या निवडणुकीत नगराध्यक्षपद महिलांसाठी राखीव आहे. या पदासाठी प्रथमच थेट निवडणूक होत आहे. अर्थात नगर परिषदेतील मतदार थेट नगराध्यक्ष निवडून देणार आहेत.

या पार्श्वभूमीवर नगर परिषद निवडणूक मार्च-एप्रिल महिन्यात होणे अपेक्षित आहे. निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम आखून दिला आहे. यानुसार प्रभागांची संख्या, प्रभागनिहाय लोकसंख्या, नगर परिषद क्षेत्र, क्षेत्राचे सीमांकन, नकाशा यांसह प्रारूप प्रभाग रचना आदी प्रस्ताव नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे ३० नोव्हेंबपर्यंत पाठवायचे आहेत.  ७ डिसेंबरला सदस्यपदासाठीची आरक्षण सोडत प्रसिद्ध होईल. या आरक्षणाची सोडत ११ डिसेंबर रोजी काढली जाईल.

नगर परिषदेतील प्रारूप प्रभाग रचना त्यातील सर्व तपशिलांसह रहिवाशांच्या माहितीसाठी तसेच हरकतीसाठी १४ डिसेंबर रोजी प्रसिद्ध होणार आहे.

१४ ते २१ डिसेंबपर्यंत हरकती मागविण्यात येणार आहेत. या हरकती वेळेत आलेल्या हरकतींवर २७ डिसेंबरला सुनावणी होईल. प्रभागरचना ७ जानेवारीला प्रसिद्ध करण्यात येईल.नगर परिषदेतील प्रभाग संख्या १४ आहे तर या प्रभागातील सदस्य संख्या नगराध्यक्षांसह नगरसेवक अशी एकूण २९ असेल. प्रत्येक प्रभागासाठी दोन नगरसेवक अशी आताची संख्या आहे. २००९ प्रमाणे या वेळची निवडणूक होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 29, 2018 2:09 am

Web Title: palghar municipal council started the election process
Next Stories
1 डोंबिवलीत दोन मैत्रिणींनी केली आत्महत्या
2 वर्सोव्यावरून सावळागोंधळ
3 महाविद्यालयांत ‘लोकांकिका’ची उत्सुकता शिगेला
Just Now!
X