१७ राज्यांतील संघांचा सहभाग; दिल्लीकडे ५ सुवर्ण तर महाराष्ट्राकडे १ रौप्य व १ कास्य पदक

पालघर जिल्ह्यत चिंचणी येथे प्रथमच झालेल्या रस्सीखेच स्पर्धेत दिल्लीच्या संघाने आपले वर्चस्व राखत पाच सुवर्ण पदके पटकावली, तर महाराष्ट्राच्या संघास १ रौप्य व १ कास्य पदक मिळाले.

येथील रस्सीखेच संघटनेतर्फे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. जम्मू काश्मीर, दिल्ली, मणिपूर, पंजाब, महाराष्ट्रासह एकूण १७ राज्यांतील संघांनी भाग घेतला. प्रत्येक संघात ८ खेळाडू होते. मैदानावर व वाळूत स्पर्धा घेण्यात आली.

मैदानावर झालेल्या स्पर्धेत पुरुषांच्या ६४० किलो वजनी गटात दिल्लीच्या संघाला सुवर्ण, मध्यप्रदेश रौप्य व पंजाब पाँवरला कास्य पदक मिळाले. महिलांच्या ५०० किलो वजनी गटात दिल्लीला सुवर्ण, महाराष्ट्र रौप्य तर छत्तीसगड कास्य पदकावर समाधान मानावे लागले. त्यातच महिला व पुरुषांच्या ५४० किलो संघात दिल्लीला सुवर्णपदक, छत्तीसगड रौप्यपदक व मध्यप्रदेश कास्यपदक मिळाले. समुद्राच्या वाळूवर झालेल्या स्पर्धेत पुरषांच्या ६४० किलो गटात दिल्ली सुवर्ण, मध्यप्रदेश रौप्य तर महाराष्ट्राला कास्य पदकावर समाधान मानावे लागले. पुरुष-महिलांच्या ५४० किलो गटात समुद्रावर झालेल्या स्पर्धेत दिल्लीला सुवर्ण, छत्तीसगड रौप्य तर गुजरातने कास्य पदक मिळून खाते खोलले.

स्पर्धेचे उदघाटन संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मदन मोहन यांच्या हस्ते करण्यात आले होते. याप्रसंगी महाराष्ट्राच्या अध्यक्षा माधवी पाटील, संघटनेचे पालघर जिल्हा अध्यक्ष बाबजी कठोले, सचिव कृष्णा देशमुख आदी उपस्थित होते.