News Flash

‘जि. प.’च्या शाळेतील विद्यार्थी इंग्रजी बोलणार

‘आंग्लभाषा अध्यापन संस्थे’च्या माध्यमातून भाषा शिकवण्याचे धडे

‘आंग्लभाषा अध्यापन संस्थे’च्या माध्यमातून भाषा शिकवण्याचे धडे
प्रत्येक शहरामध्ये इंग्रजी भाषेच्या शाळांविषयी कमालीचे आकर्षण निर्माण झाले असून त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांकडे विद्यार्थी पालक पाठ फिरवू लागले आहेत. मुलांना इंग्रजी बोलता यावे ही अपेक्षा घेऊन इंग्रजी शाळांकडे वळणाऱ्या पालकांसाठी ‘राज्य आंग्लभाषा अध्यापन संस्था’ औरंगाबाद यांच्या माध्यमातून एक विशेष उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून शिक्षकांकडूनच विद्यार्थ्यांना इंग्रजीचे ज्ञान देण्यात येणार असून त्याबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये इंग्रजी बोलण्याचा आत्मविश्वासही निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. संस्थेच्या या उपक्रमात जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी सहभाग घेऊन विद्यार्थ्यांना इंग्रजीतून बोलण्यास प्रोत्साहित करण्याचे आवाहन संस्थेच्यावतीने करण्यात आले आहे.
शालेय विद्यार्थ्यांमधील इंग्रजीची भीती काढून टाकून त्यांना इंग्रजी भाषेत बोलते करण्याचा निर्णय राज्य आंग्लभाषा अध्यापन संस्थेच्यावतीने घेण्यात आला आहे. या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील शिक्षकांना विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषा बोलण्यासाठी तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. ज्या शिक्षकांना या उपक्रमात सहभागी व्हायचे आहे त्यांनी यासाठी आवश्यक नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन शिक्षणाधिकारी मीना यादव यांनी केले आहे.
नोंदणीची शेवटची तारीख ३१ मे २०१६ असून http://goo.gl/forms/w1JrYAqkni   या संकेतस्थळाच्या लिंकवर जाऊन ही नोंदणी करावयाची आहे. या कार्यक्रमाचे हे पहिलेच वर्ष असल्यामुळे किमान पाच हजार शिक्षक नाव नोंदवतील, अशी आशा संस्थेकडून व्यक्त करण्यात आले आहे.
गेल्या वर्षी राज्यातील अनेक जिल्हा परिषद शाळांमध्ये इंग्रजी माध्यमाची मुले दाखल होत असल्याचेही आढळले. या शाळांचा अभ्यास केला असता या शाळा मराठी माध्यमात चांगल्या गुणवत्तेच्या शिक्षणासोबत इंग्रजी विषयसुद्धा गुणवत्तापूर्ण पद्धतीने शिकवत आहेत. इंग्रजी माध्यमातून मुलांना काढून मराठी माध्यमात घालणाऱ्या तसेच जि. प. शाळांच्या गुणवत्तेवर खूश असणाऱ्या पालकांशी संवाद साधल्यानंतर मुलांना स्पोकन इंग्लिश जमले पाहिजे, असा सूर या पालकांनी लावला. राज्यात २००० सालापासून पहिल्या वर्गापासून इंग्रजी अनिवार्य करण्यात आले आहे. मात्र त्यास अपेक्षित परिणाम मिळालेला नाही. तसेच मराठी माध्यमातून शिकलेल्या शिक्षकांना इंग्रजी शिकवणे जमणार नाही, असा समज पसरू लागला आहे.
बऱ्याच शिक्षकांना अजूनही तसेच वाटत आहे. त्यामुळे राज्य आंग्लभाषा संस्था शिक्षकांची मदत घेऊन हा कार्यक्रम राबवीत आहे.
यापूर्वी याबाबतीत यशस्वी झालेल्या आणि इतर शिक्षकांच्या मदतीस तयार असलेल्या शिक्षकांनीही या लिंकअंतर्गत नोंदणी करायची आहे, असे संस्थेच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
असा उपक्रम
चांगल्या पद्धतीने मुलांना इंग्रजी बोलण्यास शिकवणाऱ्या शिक्षकांना या उपक्रमात जोडून घेण्यात येणार आहे. हे शिक्षक आपला अनुभव इतर इंग्रजी भाषा शिकवणाऱ्या शिक्षकांना देऊ शकणार आहेत. त्यामुळे या माध्यमातून इंग्रजी भाषा शिकवणारे शिक्षक आपल्या शाळेतील मुलांना इंग्रजी बोलण्यास उद्युक्त करू शकतील, मात्र त्यासाठी संकेतस्थळावर नोंदणी करणे आवश्यक आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 4, 2016 1:42 am

Web Title: palika school students speak in english
Next Stories
1 आजी-आजोबांचे नातवंडांसाठी ग्रंथालय
2 सहा नगरसेवकांचे पद धोक्यात
3 कल्याणच्या कचऱ्याची उघडय़ा वाहनातून वाहतूक
Just Now!
X