28 February 2021

News Flash

पान मसाला, सुगंधी तंबाखूची बेकायदा वाहतूक करणारे अटकेत

सुगंधी तंबाखूची बेकायदा वाहतूक करण्यात येत असून ते मुंबईच्या दिशेने निघणार असल्याची माहिती मिळाली होती.

(संग्रहित छायाचित्र)

राष्ट्रीय महामार्गावर गुजरातवरून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या कारमधून विमल पान मसाला आणि सुगंधित तंबाखू बेकायदा वाहतूक करणाऱ्यांना कासा पोलिसांनी अटक केली.

सुगंधी तंबाखूची बेकायदा वाहतूक करण्यात येत असून ते मुंबईच्या दिशेने निघणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी चारोटी टोलनाक्याजवळ सापळा रचला. संशयित कार घटनास्थळी आल्यानंतर पोलीस पथकाने मुद्देमालासह जप्त केली. या कारवाईत ८२ हजार ५६० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईत आरोपींना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश सोनवणे यांनी ‘लोकसत्ता पालघर’शी बोलताना दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 6, 2018 2:41 am

Web Title: pan masala smugglers arrested in illegal transportation
Next Stories
1 वर्गीकरण नियमाचा पालिकेकडून कचरा
2 जाहिरात धोरणाअभावी उत्पन्नावर पाणी
3 नवरात्रोत्सवात फलकबंदी शिथिल?
Just Now!
X