प्रभागातील एकाच पॅनेलच्या चार उमेदवारांना मत देण्याची सक्ती असल्याचा प्रचार

ठाणे महापालिकेची निवडणूक यंदा पॅनेल पद्धतीने होणार असल्याने मतदारांना चार वेळा मतदान करावे लागणार आहे. या प्रक्रियेविषयी मतदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण असतानाच काही प्रभागांमध्ये उमेदवारांनी याचा गैरफायदा घेण्यास सुरुवात केली आहे. प्रभागामध्ये एकाच पॅनेलच्या चारही उमेदवारांना मतदान करणे बंधनकारक असल्याचा प्रचार करण्यात येत असल्याच्या तक्रारी निवडणूक यंत्रणांकडे दाखल झाल्या आहेत. अशा पद्धतीने मतदारांची दिशाभूल करण्यात येत असल्याने निवडणूक यंत्रणाही सावध झाली आहे. एका पॅनेलमधील चार जागांसाठी मतदान करणे बंधनकारक असले तरी मतदार चारही वेळा वेगवेगळय़ा पक्षांच्या वा पॅनेलच्या उमेदवारांना मतदान करू शकतात, असे स्पष्टीकरण ठाणे महापालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिले आहे.

ganesh naik, sanjeev naik, thane, lok sabha election 2024, shiv sena, shinde group, sanjeev naik
ठाण्यासाठी नाईक नकोतच, शिवसेना नेत्यांचे मुख्यमंत्र्यांना गाऱ्हाणे
Alibaug, Rahul Narvekar
अलिबागचे नामकरण करण्याची मागणी, विधानसभा अध्यक्षांच्या विरोधात तक्रार दाखल
opposition india alliance
बिहार ते महाराष्ट्र; लोकसभेच्या जागांसाठी काँग्रेसला करावी लागतेय तारेवरची कसरत
Chhagan Bhujbal willing to contest Nashik Lok Sabha seat
शिंदे गटाची पुन्हा मुख्यमंत्र्यांकडे धाव; भुजबळांना उमेदवारीच्या चर्चेने अस्वस्थता

ठाणे महापालिकेची गतनिवडणूकही पॅनेल पद्धतीनेच पार पडली होती; परंतु त्या वेळी दोन जागांचे एक पॅनेल होते. यंदा एका प्रभागात चार जागा असून मतदारांना चार वेळा मतदान करावे लागणार आहे. यामुळे मतदारांत विशेषत: पहिल्यांदाच मतदान करणाऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. याचा गैरफायदा काही उमेदवार घेत आहेत. ठाणे महापालिका निवडणुकीसाठी यंदा ३३ पॅनेलपासून १३१ जागांसाठी निवडणूक घेण्यात येत आहे. ३२ पॅनेलमध्ये प्रत्येकी चार जागा आहेत, तर दिवा परिसरातील एका पॅनेलमध्ये तीन जागा आहे. या निवडणुकीसाठी सर्व पक्षांनी आपआपले उमेदवार रिंगणात उतरवले असले तरी काही प्रभागांमध्ये उमेदवारांना पाहून मतदान होण्याची शक्यता आहे. पाच वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत अनेक पॅनेलमधून वेगवेगळ्या पक्षांचे उमेदवार निवडून आल्याचा इतिहास आहे. मतांची ही अदलाबदल टळावी यासाठी काही प्रभागांत एकाच पक्षाच्या चारही उमेदवारांना मतदान करणे बंधनकारक असल्याचा चुकीचा प्रचार सुरू आहे. विशेषत: झोपडपट्टी परिसरात आणि अल्प उत्पन्न गटातील रहिवाशांचा भरणा असलेल्या प्रभागांमध्ये असा प्रचार होत असल्याच्या तक्रारी निवडणूक यंत्रणांकडे आल्या आहेत.

अशा प्रकारे मतदारांची दिशाभूल करण्याचे प्रकार चुकीचे आहे. चार जागांच्या पॅनेलमधील कोणत्याही उमेदवारास मतदान करण्याचा अधिकार मतदारांना आहे. त्यामुळे अशा चुकीच्या प्रचारास मतदारच योग्य ते उत्तर देतील.

संजीव जयस्वाल, आयुक्त, ठाणे महापालिका