प्लास्टिकच्या वापराने होणाऱ्या प्रदूषणामुळे राज्य शासनाने प्लास्टिक वापरावर बंदी घातली. शासनाच्या निर्णयाला अनुसरून प्लास्टिकला पर्याय म्हणून कागदी पिशव्याचा वापर व्हावा या हेतूने शहापूर तालुक्यातील खर्डी येथील जीवनदीप महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने ‘एकदिवसीय कागदी पिशव्यांची कार्यशाळा’ आयोजित करण्यात आली होती. प्लास्टिकच्या पिशव्यांना पर्याय उपलब्ध करून स्वयं रोजगारनिर्मिती करून देणे हा कार्यशाळेचा मुख्य उद्देश होता. कागदापासून पिशवी, रंगीबेरंगी, फुले, रांगोळी, नेहमी वापरण्यात येणाऱ्या वस्तू निर्मितीचे प्रशिक्षण कार्यशाळेचे प्रशिक्षक वर्षां गंद्रे यांनी विद्यार्थ्यांना दिले. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसोबतच शहापूरमधील दहा महिला बचत गटांतील सत्तर महिलांना प्रशिक्षण देण्यात आले.