ठाणे रेल्वे स्थानक परिसरात पार्किंगचा गोंधळ

ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी मोठा गाजावाजा करत उभारण्यात आलेले वाहनतळ चालवण्यासाठी ठेकेदार मिळेनासा झाल्याने हतबल रेल्वे प्रशासनाने अखेर या ठिकाणी वाहनांना मोफत पार्किंग सेवा देऊ केली आहे. मात्र, कंत्राटदार वा देखरेख कर्मचारी नसल्याने या वाहनतळावर मोठा गोंधळ उडाल्याचे दिसून येते. वाहनचालकांची बेशिस्ती, कशाही उभ्या करण्यात आलेल्या दुचाकी यांमुळे या वाहनतळाचा उपयोग कमी आणि उपद्रव जास्त होऊ लागला आहे.

dharavi, dharavi redevelopment project, 100 teams
धारावी पुनर्विकास प्रकल्प : महिन्याभरात सुमारे एक हजार बांधकामांचे सर्वेक्षण; सर्वेक्षणासाठी १०० पथके तैनात करणार
Kamathipura Redevelopment
कामाठीपुरा पुनर्विकासासाठी सल्लागाराची नियुक्ती
heavy traffic in patri pool area in kalyan
कल्याण : पत्रीपुलामुळे पुन्हा मनस्ताप, आता रस्ते कामामुळे अभूतपूर्व वाहतूक कोंडी
way of dharavi redevelopment is cleared railway land finally transferred to DRP
धारावी पुनर्विकासाचा मार्ग मोकळा, रेल्वेची २५.५७ एकर जमीन अखेर ‘डीआरपी’कडे हस्तांतरित

मध्य रेल्वे मार्गावरील सर्वाधिक गर्दीचे स्थानक म्हणून ठाणे रेल्वे स्थानक ओळखले जाते. या ठिकाणी दररोज शेकडोंच्या संख्येने खासगी वाहने येजा करत असतात. त्यामुळे रेल्वे स्थानकाचा परिसर नेहमीच कोंडीमय होत असतो. हे लक्षात घेऊन लोकप्रतिनिधींच्या आग्रहामुळे रेल्वे प्रशासनाने दोन वर्षांपूर्वी या ठिकाणी बहुमजली वाहनतळ प्रकल्पाचे काम सुरूकेले. हा प्रकल्प अवघ्या दीड वर्षांत पूर्ण करण्यात येईल, असे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले होते. मात्र, सरकारी अनास्थेमुळे आजही हा प्रकल्प पूर्ण होऊ शकलेला नाही. त्यामुळे रेल्वे स्थानक परिसरात मोठय़ा प्रमाणात अनधिकृत वाहनतळांना पेव फुटला होता. यावर बंदी घालण्यासाठी रेल्वेने तीन महिन्यांसाठी अपूर्ण अवस्थेत असलेला पार्किंग प्लाझा वाहनांसाठी खुला केला. यासाठी प्रायोगिक तत्त्वावर ठेकेदाराची नियुक्ती केली.हे कंत्राट तीन महिन्यांसाठी देण्यात आले होते. त्यामुळे ठेक्याचा कालावधी संपताच नव्याने निविदा प्रक्रिया सुरू करणे रेल्वे प्रशासनाकडून अपेक्षित होते. मात्र तसे झाले नाही. त्यानंतर दोन वेळा निविदा प्रसिद्ध करूनही कोणत्याही कंत्राटदाराने याला पसंती दर्शवली नसल्याने आता हे वाहनतळ विनाशुल्क खुले करून देण्यात आले आहे.

या ठिकाणी ठेकेदार नसल्याने सगळा बेशिस्तीचा कारभार सुरू झाला आहे. गर्दीच्या वेळेत या ठिकाणी वाहने उभी करताना अक्षरश गोंधळ सुरू असल्याचे चित्र दिसू लागले आहे. काही वाहने तर या ठिकाणी दोन दिवसांपेक्षाही अधिक काळ उभी असल्याचे चित्र दिसून येत आहे. फुकटात वाहनतळ उपलब्ध झाल्याने आसपासच्या वसाहतींमधील वाहनेही या ठिकाणी उभी केली जात असल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत.

रेल्वे स्थानकात मोफत पार्किंग सुरू करणे नियमबाह्य आहे. त्यामुळे बेशिस्त वाढू शकते. रेल्वेच्या संबंधित विभागाने कंत्राटदार नेमणे गरजेचे होते. संबंधित विभागाला याच्या सूचना देऊन कारवाई करण्यात येईल.

 -ए.के. सिंह, जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे