tv02

ठाणे जिल्ह्य़ात खाडीचा विस्तृत पट्टा असून या खाडीमध्ये मोठी जैवविविधा आणि खारफुटींची जंगले आहेत. हा परिसर राज्य शासनाकडून पक्ष्यांसाठी संरक्षित केला गेला आहे. मात्र तरीही या भागात खारफुटींच्या जंगलावर भलेमोठे सक्शनपंप आणि ट्रॉलर चढवून खारफुटी आणि तिवरांची कत्तल केली जाते. अनेक वर्षांपासून चोरटय़ा रेती उपशामुळे ही कत्तल खुलेआम होत असून शासकीय यंत्रणांचा त्यावर कोणत्याही प्रकारचा वचक राहिलेला नाही. गेल्या दोन वर्षांपासून मुंब्रा, कळवा आणि कोपर खाडी किनाऱ्यावर रेल्वे रूळांना खेटून या रेतीमाफीयांनी हा विध्वंस सुरू ठेवली आहे. त्यामुळे जानेवारी २०१४ पासून आत्तापर्यंत मोठय़ा प्रमाणात पर्यावरणाची हानी झाली आहे. मोठी जैवविविधता यामुळे नष्ट होण्याच्या मार्गावर असून त्यामुळे परिसरातील रेल्वे रूळ आणि शेतजमिनींनाही धोका आहे. या विध्वंसक रेती उपशाचा वर्षभरातील प्रवास दाखवणारी चित्रमाला..
दीपक जोशी