९६वे अखिल भारतीय मराठी नाटय़संमेलनाची रविवारी ठाण्यात सांगता झाली. मात्र, त्याआधी महिनाभर अवघे ठाणे नाटय़ संमेलनमय झाल्याचे चित्र होते. नाटय़ संमेलनाच्या नेहमीच्या वेळापत्रकात भर टाकत नाटय़ परिषदेच्या ठाणे शाखेने यंदा नाटय़ संमेलनाच्या आठवडाभर आधीपासून विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. नाटके, संगीत नाटके, परिसंवाद अशा विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून ठाणेकर रसिकांना गेले पंधरा दिवस मनोरंजनाची चांगली मेजवानी लाभली. प्रत्यक्ष नाटय़ संमेलनातही विविध कार्यक्रमांनी रंगत आणली. अशाच काही कार्यक्रमांची छायाचित्रमय झलक..