28 May 2020

News Flash

देशात आर्थिक मंदी नाहीच- पीयूष गोयल

२०१९च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत मोदी यांनी भारतीय अर्थव्यवस्थेला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले आहे.

ठाणे : देशात आर्थिक मंदी नसून, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आर्थिक सुबत्ता राखण्याचे काम केले आहे, असे मत केंद्रीय रेल्वे मंत्री आणि वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी गुरुवारी ठाण्यात व्यक्त केले.

विविध संघटनांकडून ठाणे शहर विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार संजय केळकर यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या ‘कॉफी विथ पीयूषजी’ या कार्यक्रमात त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला.

देशात विविध योजना, उपक्रम आणि प्रकल्प पंतप्रधान मोदी यशस्वीरित्या राबवत असताना दुसरीकडे देशाच्या अर्थव्यवस्थेलाही मजबूत करण्याचे काम केले जात आहे. अर्थव्यवस्था डबघाईला जात असताना ती सावरून पूर्वपदावर आणण्याचे काम मोदी यांनी केल्याचे मत गोयल यांनी व्यक्त केले.

२००८ आणि २००९ मध्ये देशातील खालावलेली आर्थिक परिस्थिती अनेकांच्या लक्षात आहे. त्यावेळी सरकारने देशाच्या अर्थव्यवस्थेला पूर्णपणे कमजोर केले. मात्र सत्तेवर येताच  मोदी यांनी भारताची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. २०१९च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत मोदी यांनी भारतीय अर्थव्यवस्थेला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले आहे. या सर्व गोष्टींमुळे देश जागतिक स्थरावर चांगल्या नावलौकिकावर आहे, असे गोयल म्हणाले. जागतिक पातळीवर ज्यावेळी आर्थिक अस्थिरता असते त्यावेळी भारतीय अर्थव्यवस्था या जागतिक अस्थितरतेतून स्वतला वेगळी ठेवू शकत नाही. वाहन उद्योग क्षेत्राला अनुसरून देशात काहीशी चिंता आहे. चीन, अमेरिका, युरोपची अर्थव्यवस्था ढासळलेली आहे. मात्र या परिस्थितीतही अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी एका पाठोपाठ एक भारतीय अर्थव्यवस्थेसाठी सुयोग्य पाऊले उचलून अर्थव्यवस्थेमध्ये सुबत्ता आणण्याचे काम केले आहे.

अर्थव्यवस्थेचा मूळ गाभा सांभाळून त्यांनी देशाची अर्थव्यवस्था स्थिरस्थावर केल्याचेही गोयल म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 18, 2019 4:06 am

Web Title: piyush goyal blames structural adjustment for slowdown
Next Stories
1 वज्रेश्वरी देवस्थान अपहार प्रकरण : मनोज प्रधान याची अटक अटळ
2 ऐन दिवाळीत मरगळ!
3 अतिसंवेदनशील केंद्रांवर ‘सीसीटीव्ही’
Just Now!
X