24 January 2020

News Flash

दुभाजकांवर लावलेली रोपटी निकृष्ट

ठाण्यातील अनेक रस्त्यांच्या दुभाजकांच्या दुरुस्तीची कामे सध्या वेगाने सुरू आहेत.

(संग्रहित छायाचित्र)

पूर्वा साडविलकर

पर्यावरणाच्या दृष्टीने निरुपयोगी असल्याचा तज्ज्ञांचा दावा

ठाण्यातील अनेक रस्त्यांच्या दुभाजकांच्या दुरुस्तीची कामे सध्या वेगाने सुरू आहेत. या दुभाजकांच्या सुशोभीकरणासाठी लावण्यात आलेली रोपटी निकृष्ट दर्जाची असून त्यांचा पर्यावरणाच्या दृष्टीने काहीच उपयोग नसल्याची टीका पर्यावरणप्रेमी संस्थांकडून केली जात आहे.

जुने ठाणे शहरासोबत घोडबंदर मार्गावरील नवे ठाणे विकसित होण्याच्या वाटेवर आहे. सुसज्ज वाहतुकीसाठी शहरात रस्ता रुंदीकरण आणि मेट्रो प्रकल्पांची कामे जोर धरू लागली आहेत. यापैकी दुभाजकांच्या दुरुस्तीदरम्यान बाधित होणारी रोपटी रस्ता रुंदीकरणानंतर रस्त्यांच्या दुतर्फा लावण्यात येत आहेत. यामध्ये यूफोर्बिया, बोगॅनविला, फिकस बेंजामिना आणि डेट पाल्म या झुडपांचा समावेश यामध्ये आहे. या झुडपांवर कोणतेही पक्षी किंवा कीटक बसत नाही, तसेच त्याचा पर्यावरणाला, निसर्गाला कोणताही फायदा होत नसल्याचे वृक्ष अभ्यासक सीमा हर्डीकर यांचे म्हणणे आहे. ही सगळी रोपटी विदेशी प्रजातींची असल्याने भारतीय हवामानात ती नीट तगही धरत नसल्याचा पर्यावरणप्रेमींचा दावा आहे.

माजिवडा, कापूरबावडी, वर्तक नगर, नितीन कंपनी, कॅडबरी जंक्शन, घोडबंदर, ज्ञानेश्वर नगर आणि कामगार या मार्गावरील दुभाजकांमध्ये विदेशी जातीच्या रोपटय़ांची लागवड करण्यात आली आहे; परंतु ही झुडपे फक्त सुशोभीकरणासाठी असून या रोपटय़ांमुळे पर्यावरणाला कोणताही फायदा होत नसल्याने पर्यावरणप्रेमींमधून नाराजीचे सूर उमटत आहे.

ज्ञानेश्वरनगर मार्गावरील दुभाजकांमध्ये लावण्यात आलेली रोपटी सुकलेल्या अवस्थेत पाहायला मिळत आहेत. यासंदर्भात ठाणे महापालिका उद्यान विभागाशी संपर्क साधला असता, ही रोपटी कामगार मार्गावरील पदपथाजवळ पुनरेपित करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच या रोपटय़ांना जास्त पाण्याची आवश्यकता नसल्याचा दावाही उद्यान विभागाने केला.

दुभाजकांदरम्यान लावण्यात येणारी रोपटी ही इतर अन्य रोपटय़ांप्रमाणेच आहेत. ही रोपटी विदेशातील असल्यामुळे पाहणाऱ्याला ती आकर्षित करत असतात. ही रोपटी पर्यावरणपूरकच आहेत, असे ठाणे महापालिकेचे उद्यान निरीक्षक डॉ. राहुल दुर्गुडे यांनी सांगितले.

तल दुभाजकांदरम्यान लावण्यात येणारी रोपटी ही अतिशय निकृष्ट दर्जाची आहेत. त्याचा पर्यावरणाला काडीमात्र फायदा होत नाही. महापालिकेने कवडीमोल किमतीत मिळणाऱ्या या रोपटय़ांऐवजी पर्यावरणाला पूरक ठरतील अशी रोपटी दुभाजकांमध्ये लावावीत, अशी मागणी फर्न-संस्थेच्या सीमा हर्डीकर यांनी केली आहे.

First Published on April 25, 2019 1:41 am

Web Title: plantation on divider disgusting
Next Stories
1 पत्नी डान्सबारमध्ये करायची काम; पतीने केली हत्या, मृतदेहाचे केले तुकडे
2 दिवावासीयांचा पैसा पाण्यात!
3 नोकरीच्या बहाण्याने ४० जणांना गंडा
Just Now!
X