X

पोलिसाकडूनच सहकाऱ्याच्या पत्नीवर बलात्कार

पोलिसाने आपल्या सहकाऱ्याच्या पत्नीवर बलात्कार केल्याचा प्रकार अंबरनाथमध्ये उघडकीस आला आहे

पोलिसाने आपल्या सहकाऱ्याच्या पत्नीवर बलात्कार केल्याचा प्रकार अंबरनाथमध्ये उघडकीस आला आहे. योगीराज वाघ असे या पोलिसाचे नाव असून तो ठाणे ग्रामीण पोलिसात कार्यरत आहे.

हे पोलीस एकमेकांच्या ओळखीचे होते. याचा गैरफायदा घेत या पोलिसाने मित्राच्या घरात प्रवेश केला. त्यानंतर या पोलिसाचे त्यांच्या घरी येणे जाणे वाढले. यावेळी मित्राच्या पत्नीवर वाईट नजर ठेवत, चाकूचा धाक दाखवून पती आणि मुलाला ठार मारण्याची धमकी देत तिच्यावर वारंवार अत्याचार केले. मात्र आरोपी हा पोलीस असल्याने आणि आपल्या पतीला आणि मुलाला मारण्याची धमकी दिल्याने महिला प्रचंड दबावाखाली होती.

घरात अचानक काही दिवसांपासून पीडित महिला घरच्यांशी काहीही न बोलता एकलकोंडी झाल्याने पतीचा संशय वाढला. पतीने पीडितेला विश्वासात घेतल्यावर तिने घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर याप्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून अंबरनाथ शिवाजीनगर पोलीस ठाण्यात नराधम पोलिसाविरोधात गुन्हा दाखल झाला असून अद्याप आरोपी पोलिसाला अटक करण्यात आली नाही.

  • Tags: rape,
  • वाचा / प्रतिक्रिया द्या
    Outbrain