01 December 2020

News Flash

धक्कादायक! चार वर्षांपासून पोटच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधम पित्याला अटक

स्वत:च्या पोटच्या मुलीवर मागच्या चार वर्षांपासून बलात्कार करणाऱ्या नराधम पित्याला ठाण्यातील कासारवडावली पोलिसांनी अटक केली आहे.

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

स्वत:च्या पोटच्या मुलीवर मागच्या चार वर्षांपासून बलात्कार करणाऱ्या नराधम पित्याला ठाण्यातील कासारवडावली पोलिसांनी अटक केली आहे. पीडित मुलगी १४ वर्षांची असून मागच्या सात वर्षांपासून ती वडिलांसोबत राहत आहे. पीडित मुलीचे आई-वडिल विभक्त झाले असून आई कासारवडावली परिसरातच राहते. आरोपी पिता पेशाने इलेक्ट्रीशिअन असून स्वत:च्या गरज भागवण्यापुरता कमाई करताना त्याला नाकीनऊ येत होते.

आर्थिक अडचणीमुळे मागच्या वर्षभरापासून त्याने मुलीचे शिक्षण बंद केले होते. मागच्या चार वर्षांपासून हा नराधम पिता मुलीचे लैंगिक शोषण करत होता. रोजच्या त्रासाला कंटाळून अखेर या मुलीने तिची दुखदायक कहाणी शेजाऱ्यांना सांगितली. शेजाऱ्यांनी या मुलीला पोलिसात तक्रार दाखल करण्यासाठी राजी केले.

पीडित मुलीने शेजाऱ्यांसोबत कासारवडावली पोलीस स्टेशन गाठून बुधवारी संध्याकाळी पित्याविरोधात बलात्काराची तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीला अटक करुन पीडित मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवले. आरोपीला न्यायालयामध्ये हजर केले असता न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली. पीडित मुलीला सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरु आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 21, 2018 4:27 pm

Web Title: police arrested father who raped own daughter
Next Stories
1 पडघा टोल नाका बंद करण्याच्या मागणीसाठी शिवसेना आक्रमक
2 जलवाहतुकीसाठी नवी मुंबईत टर्मिनल
3 गणेशोत्सव संपत आला, तरी भिवंडीतील खड्डे कायम
Just Now!
X