लिंकद्वारे मजुरांचे सर्वेक्षण

किशोर कोकणे, लोकसत्ता

Stone Pelting in West Bengal
Ram Navami : पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार, मिरवणुकीत दगडफेक; पोलिसांकडून अश्रूधुराच्या नळकांड्यांचा वापर!
Elon Musk
टेस्लातील १० टक्के कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर कुऱ्हाड, एलॉन मस्क यांनी मेलद्वारे दिला इशारा; म्हणाले, “खर्च कमी करण्यासाठी…”
worlds eldest person
सुदृढ आणि दीर्घायुष्य जगण्यासाठी काय लागतं? १९०० मध्ये जन्मलेल्या व्यक्तीनं सांगितलं सोपं गुपित!
heavy traffic jam for two hours in dombivli
डोंबिवली दोन तासांपासून अभूतपूर्व वाहतूक कोंडीत; रविवारी खरेदीसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांना फटका

ठाणे : करोनाचा प्रादुर्भाव राज्यात पसरला असून त्याचा सर्वाधिक फटका परप्रांतीय मजुरांना बसला आहे. या मजुरांना सुखरूप घरी पोहोचवता यावे यासाठी भिवंडी पोलिसांनी एक लिंक तयार केली आहे. या लिंकमध्ये मजुरांची माहिती गोळा होत असून त्यांना पोलीस ठाण्यात येण्याची गरजही भासत नाही. त्यामुळे पोलीस ठाण्यातील होणारी गर्दी काही प्रमाणात टळत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

या लिंकच्या मदतीने भिवंडीतून गेल्या चार दिवसांत रेल्वे आणि जिल्हा प्रशासनाच्या मदतीने दोन हजार परप्रांतीयांना त्यांच्या प्रांतात पाठवणे पोलिसांना शक्य झाले आहे. त्यामुळे भिवंडी पोलिसांचा हा पॅटर्न ठाणे पोलीस आयुक्तालयातील सर्वच पोलीस ठाण्यांत सुरू होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

भिवंडी शहरात हजारो मजूर राहत असून अनेकजण हातमाग किंवा बांधकाम क्षेत्रात मजुरी करत आहेत. मात्र देशात टाळेबंदी जाहीर झाल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे. आम्हाला आमच्या प्रांतात सोडा, अशी विनवणी त्यांच्याकडून करण्यात येत आहे. हे मजूर भिवंडीत दाटीवाटीच्या भागात राहत असल्याने करोनाचा प्रादुर्भाव झपाटय़ाने पसरण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. या भीतीने भिवंडीतील नारपोली, भिवंडी शहर, शांतीनगर, भोईवाडा, निजामपुरा आणि कोनगाव या सहा पोलीस ठाण्यांसाठी भिवंडी पोलिसांनी एक लिंक तयार केली आहे. ही लिंक व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून पोलीस अधिकारी संबंधित विभागातील नगरसेवक, सरपंच तसेच विविध सामाजिक संस्थांना पाठवत आहेत. हे सामाजिक कार्यकर्ते त्यांच्या विभागातील मजुरांना ही लिंक पाठवीत आहेत. तर, ज्यांच्याकडे व्हॉट्सअ‍ॅप मोबाइल उपलब्ध नाही. त्यांचा पोलीस शोध घेऊन त्यांची माहिती या लिंकमध्ये जमा करत आहेत. त्यामुळे किती मजुरांची माहिती गोळा झाली, त्यांची नावे, मोबाइल क्रमांक घराचा पत्ता याचा तपशील पोलिसांच्या हाती उपलब्ध होऊ लागला आहे. त्यामुळे घरी जाण्यासाठी इच्छुक असलेल्या मजुरांना तात्काळ मदत मिळत असून त्यांच्या गावी जाण्याचा मार्ग मोकळा होत आहे. या प्रवाशांची माहिती त्या-त्या पोलीस ठाण्यातून गोळा झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाच्या आणि रेल्वेच्या मदतीने या मजुरांना गावी पाठविण्याची व्यवस्था पोलीस करत आहेत.