News Flash

प्रदूषण नियंत्रण मंडळाची ‘कडोंमपा’ला नोटीस

वैद्यकीय कचऱ्याची आधारवाडी कचराभूमीत विल्हेवाट

वैद्यकीय कचऱ्याची आधारवाडी कचराभूमीत विल्हेवाट

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत करोना रुग्णांची सेवा करताना तयार होणारा वैद्यकीय कचरा आधारवाडी येथील कचराभूमीवर नियमबाह्य़ टाकल्याप्रकरणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कल्याण विभागाच्या प्रादेशिक अधिकाऱ्यांनी महापालिकेला नोटीस बजावली आहे.

महापालिका हद्दीत खासगी करोना रुग्णालयांमध्ये तयार होणारा वैद्यकीय कचरा प्लॅस्टिक पिशव्यांमध्ये भरून तो कल्याणमधील आधारवाडी कचराभूमीवर टाकण्यात येतो, अशी याचिका डोंबिवलीतील एक याचिकाकर्ते किशोर सोहोनी यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे.  याचिकाकर्त्यांच्या तक्रारीनंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी आधारवाडी क्षेपणभूमीला पालिकेच्या घनकचरा अधिकाऱ्यांसह भेट दिली. त्या वेळी कचराभूमीवर करोना रुग्णालयातील रुग्णांसाठी वापरण्यात आलेल्या औषधांची वेष्टने, सुईंची वेष्टने, फळांच्या रसाचे रिकामे लहान खोके, कागदीबोळे आढळून आले.

पालिकेचा उंबर्डे येथे जैव वैद्यकीय कचरा प्रक्रिया प्रकल्प आहे. या प्रकल्पाची दर दिवसाची क्षमता तीन मेट्रिक टन आहे. सध्या या प्रकल्पात एक हजार किलो कचरा प्रक्रियेसाठी येत आहे. मोठय़ा आकाराच्या प्लॅस्टिक पिशव्या उपलब्ध झाला नसल्यामुळे कामगारांनी कचराभूमीवरील एकत्रित कचरा लाल रंगाच्या पिशव्यांमधून बांधून ठेवला. असा प्रकार यापुढे केला जाणार नाही, असा खुलासा घनकचरा विभागाच्या अधिकाऱ्याने  मंडळाच्या अधिकाऱ्यांकडे केला.

पालिका हद्दीतील करोनाबाधित भिवंडीजवळील टाटा आमंत्रा केंद्रात ठेवले जातात. तिथे मंडळ अधिकाऱ्यांनी भेट दिली. या ठिकाणी करोना रुग्ण कचरा आणि नियमितचा कचरा वेगळा करण्यासाठी स्वतंत्र कुंडय़ा ठेवण्यात याव्यात. वैद्यकीय कचरा उंबर्डे येथील वैद्यकीय प्रक्रिया केंद्रात नेण्यात यावा. या सर्व जैविक वैद्यकीय कचऱ्याची माहिती पालिकेने प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या ऑनलाइन खात्यावर देण्याचे आदेश मंडळाचे प्रादेशिक अधिकारी शंकर वाघमारे यांनी दिले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 14, 2020 3:39 am

Web Title: pollution control board issues notice to kdmc zws 70
Next Stories
1 उच्चभ्रूंच्या वस्तीत करोनाचा फैलाव
2 रुग्णशोध मोहिमेचा फज्जा
3 अंबरनाथमध्ये करोनामुळे आतापर्यंत १०० जणांचा मृत्यू
Just Now!
X