tv13tv14tv15tv16tv17tv18ऐतिहासिक कल्याण शहराच्या पाण्याचा मुख्य स्रोत म्हणून तलावांकडे पाहिले जात होते. शहरातील विहिरींना भूगर्भातून पाण्याचा पुरवठा करण्याचे मुख्य काम तलावांच्या माध्यमातून होत होते, असे संशोधकांचे म्हणणे आहे. शहरीकरणामुळे कल्याणमधील तलावांच्या संख्येत झपाटय़ाने घट होत असून सध्या अस्तित्वात असलेल्या तलावांची पुरती दुरवस्था झाली आहे. महापालिकेच्या वतीने शहरातील काळा तलावाच्या सुशोभीकरणासाठी कोटय़वधीचा खर्च केला जात असताना बाकीच्या तलावांकडे मात्र प्रशासन ढुंकूनही बघत नाही. तलावांमध्ये कचरा टाकून कालांतराने भरावा आणि नंतर झोपडय़ांचे, तबेल्यांचे अतिक्रमण करून तलावांची जागा हडप केली जाते आहे. प्रत्येक तलावाची एक वेगळी समस्या आहे. दुर्गाडीजवळचा भटाळे तलाव अतिक्रमणामुळे नामशेष होऊ लागला आहे.
दीपक जोशी