News Flash

अतिसंक्रमित क्षेत्रे घटणार?

रुग्णसंख्येच्या आढाव्यानंतर निर्बंध शिथिल होण्याची शक्यता

अतिसंक्रमित क्षेत्रे घटणार?

रुग्णसंख्येच्या आढाव्यानंतर निर्बंध शिथिल होण्याची शक्यता

ठाणे : महापालिका क्षेत्रातील २७ करोना अतिसंक्रमित परिसरातील टाळेबंदीची मुदत शुक्रवारी (३१ जुलै) संपुष्टात येणार असून या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाकडून गेल्या काही दिवसातील रुग्णसंख्येचा आढावा घेऊन अतिसंक्रमित परिसराची पुनर्रचना करण्याच्या हालचाली सुरू आहेत. गेल्या काही दिवसांपासून रुग्णसंख्येत घट झाल्याने या परिसरांचा आढावा घेतला जात असून अतिसंक्रमित क्षेत्रात घट

अपेक्षित आहे, अशी माहिती महापालिकेतील वरिष्ठ सूत्रांनी लोकसत्ताला दिली.

ठाणे महापालिका क्षेत्रातील केवळ अतिसंक्रमित परिसरात ३१ जुलैपर्यंत टाळेबंदी कायम ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने दहा दिवसांपूर्वी घेतला होता. त्यानुसार शहरात सर्वाधिक रुग्ण आढळून येत असलेल्या २७ परिसरात टाळेबंदी लागू करण्यात आली आहे. तर घोडबंदर परिसरात रुग्ण संख्या जास्त असली तरी विखुरलेल्या रुग्णांमुळे या परिसराची टाळेबंदीतून सुटका झाली होती. या सर्वच भागातील रुग्ण संख्या कमी करण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत असून त्यामध्ये ताप सर्वेक्षण आणि संशयित रुग्णांची जलद प्रतिजन चाचणी करण्यात येत आहे. या उपाययोजनांचा परिणाम आता दिसू लागला असून शहरातील अतिसंक्रमित परिसरामध्ये रुग्ण संख्येत गेल्या काही दिवसांपासून घट होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे अतिसंक्रमित परिसरातील रुग्ण संख्येचा आढावा घेऊन त्याद्वारे रुग्ण संख्या कमी झालेले परिसर अतिसंक्रमितच्या यादीतून वगळण्याचा हालचाली प्रशासकीय पातळीवर सुरू आहेत, अशी माहिती महापालिका सूत्रांनी दिली.

 

प्रतिबंधित क्षेत्रांची संख्या

प्रभाग क्षेत्र                     १८ जुलै        २९ जुलै

माजिवाडा- मानपाडा      ५६                    ५८

वर्तकनगर                      ३०                    ३१

लोकमान्य- सावरकर     ३४                     ३९

नौपाडा-                         ५२                     ४३

कोपरी उथळसर             ४१                     ३७

वागळे इस्टेट                  २३                     ८

कळवा                           ५५                     ३९

मुंब्रा                              १९                     ५

दिवा                              ३१                    २२

शहरातील अतिसंक्रमित क्षेत्र

’ लोकमान्यनगर-सावरकरनगर प्रभाग समिती : लोकमान्यनगर, आंबेवाडी, इंदिरानगर, हनुमाननगर, सावरकरनगर

’ कळवा प्रभाग समिती :  गावदेवी मैदानासभोवतालचा परिसर, शिवाजीनगर, विटावा.

’ मुंब्रा प्रभाग समिती : महावीरनगर, शैलेशनगर, संतोषनगर, अमृतनगर.

’ नौपाडा-कोपरी प्रभाग समिती : आनंदनगर, चेंदणी कोळीवाडा, दादोजी कोंडदेव क्रीडा प्रेक्षासमोरील भाग, वरची पारसीवाडी

’ उथळसर प्रभाग समिती : आझादनगर, राबोडी, गोकुळनगर.

’ वर्तकनगर प्रभाग समिती :  लक्ष्मी-चिरागनगर

’ वागळे इस्टेट : किसननगर, अंबिकानगर-२, रामनगर, रतनाबाई कंपाऊंड-किसननगर-३, शांतीनगर, शिवाजीनगर.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 31, 2020 3:27 am

Web Title: possibility of relaxation in thane city after patient review zws 70
Next Stories
1 वाढीव उपचार बिलांचा परतावा
2 महामार्गावरील सेवा रस्त्यांवर कचऱ्याचे ढीग
3 साहित्यनगरीत ग्रंथालयाची उपेक्षा
Just Now!
X