30 September 2020

News Flash

दोघा न्यायालयीन बंदिवानांचे मनोरुग्णालयातून पलायन

सुखराम जोतीराम भिल्ल (३५) आणि काशिनाथ गणू पुजारा (३८) अशी दोघांची नावे आहेत.

ठाणे येथील मनोरुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या दोन न्यायालयीन बंदिवानांनी रुग्णालय प्रशासनाच्या हातावर तुरी देऊन पलायन केल्याची घटना बुधवारी दुपारी घडली. त्यापैकी एक जण स्वत:हून पुन्हा रुग्णालयात परतला. मात्र, दुसरा अद्याप फरार आहे. पलायनाची कार्यपद्धती अतिशय नियोजनबद्घ असल्यामुळे दुसरा बंदी वेडय़ाचे सोंग घेत होता का, अशी शंका उपस्थित होऊ लागली आहे.

सुखराम जोतीराम भिल्ल (३५) आणि काशिनाथ गणू पुजारा (३८) अशी दोघांची नावे आहेत. जळगाव जिल्ह्य़ातील पारोळा पोलीस ठाण्यात सुखराम भिल्ल याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल असून तो न्यायालयीन बंदी आहे. तसेच रायगड जिल्ह्य़ातील कर्जतचा रहिवासी असलेला काशिनाथ पुजारा याच्याविरोधात कुळगाव बदलापूर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल आहे. या दोघांचे मानसिक आरोग्य बिघडल्याने त्यांना मार्चपासून ठाणे मनोरुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. परंतु या दोघांनी बुधवारी दुपारी वॉर्डाच्या पहिल्या मजल्यावरील जिन्याच्या दरवाजाची लोखंडी पट्टी तोडून वरच्या मजल्यावर प्रवेश केला. त्यानंतर या मजल्यावरील भिंतीचे ग्रील उचकटून झाडाच्या फांदीचा आधार घेऊन भिंतीवरून उडी मारून दोघांनी पलायन केले.

याप्रकरणी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या दोघांपैकी सुखराम हा गुरुवारी दुपारी पुन्हा रुग्णालयात परतला असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. तो स्वत:हून रुग्णालयात परतल्यामुळे मनोरुग्ण असल्याचे दिसून येते. परंतु काशिनाथ हा पसार झाल्यामुळे तो खरोखरच मनोरुग्ण होता का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. तो मूळगावी पळून गेल्याचा संशय असल्यामुळे पोलिसांची पथके त्याच्या गावी रवाना झाली आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 20, 2016 1:09 am

Web Title: prisoners escape psychiatric hospital
Next Stories
1 रस्ता रुंदीकरणासाठी ३७ झाडांचा बळी
2 केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेसाठी मार्गदर्शन
3 बाळकुम गावात युवा संस्कृती वाढतेय
Just Now!
X