News Flash

आकर्षक बक्षिसे जिंकण्याची पर्वणी उद्यापासून

‘लोकसत्ता ठाणे शॉपिंग फेस्टिव्हल’मध्ये खरेदीसोबत बक्षिसांची लयलूट

‘लोकसत्ता ठाणे शॉपिंग फेस्टिव्हल’मध्ये खरेदीसोबत बक्षिसांची लयलूट

ठाणे : ठाणे, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली या शहरांतील ग्राहकांना निवडक दुकानांतील खरेदीवर आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी देणारा ‘पितांबरी रुचियाना’ प्रस्तुत ‘लोकसत्ता ठाणे शॉपिंग फेस्टिव्हल’ उद्या शनिवारपासून सुरू होत आहे. १६ फेब्रुवारीपर्यंत चालणाऱ्या या खरेदीउत्सवात भाग्यवान विजेत्यांना एलईडी टीव्ही, वॉशिंग मशीन, एसी यांसारख्या आकर्षक भेटवस्तूंनी गौरवण्यात येणार आहे.

खरेदीसाठी गेल्यानंतर एखादी वस्तू खरेदी केल्यावर ग्राहकांना आकर्षक पारितोषिके जिंकण्याची संधी घेऊन येणाऱ्या लोकसत्ता ठाणे शॉपिंग फेस्टिव्हलचे यंदाचे सातवे पर्व आहे. यंदाचा पितांबरी रुचियाना प्रस्तुत ‘लोकसत्ता ठाणे शॉपिंग फेस्टिव्हल’ हा रिजन्सी आणि ठाणे महापालिका यांच्या सहकार्याने होत आहे. यानिमित्ताने वेगवेगळ्या कार्यक्रमांची पर्वणीही ठाणेकरांसाठी उपलब्ध असणार आहे. या खरेदी उत्सवात सहभागी झालेल्या वेगवेगळ्या दुकानांत खरेदी केल्यावर ग्राहकांना दररोज एक ग्रॅम सोन्याची आणि चांदीची नाणी, एलईडी टीव्ही, वॉशिंग मशीन, एअरकंडिशनर आणि रेफ्रिजरेटर यांसारख्या आकर्षक भेटवस्तू जिंकता येणार आहेत. येत्या शनिवारी, २५ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या या खरेदी उत्सवात रविवार, १६ फेब्रुवारीपर्यंत सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. या खरेदी उत्सवाच्या अखेरीस भाग्यवान विजेत्यांची निवड करण्यात येणार असून पहिल्या भाग्यवान विजेत्याला कार आणि दुसऱ्या भाग्यवान विजेत्याला सफर अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत.

महोत्सवात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या दुकानदारांनी अधिक माहितीसाठी संपर्क

’ कृष्णा नागरे- ९८३३१४७८७१

’ गोविंद भोसले- ९८१९८१४२५३

’ गौरव याज्ञिक- ७५०६५२९०२०

’ हर्षद गोफणे- ९७६९१३३३४३

’ प्रदीप पंजाबी- ९८२१५३४६७७     (नवी मुंबई)

कसे सहभागी व्हाल?

’ पितांबरी रुचियाना प्रस्तुत ‘लोकसत्ता ठाणे शॉपिंग फेस्टिव्हलमध्ये’ सहभागी दुकानात खरेदी करणाऱ्या ग्राहकांना या बक्षिसांची संधी मिळू शकेल.

’ सहभागी दुकानांमध्ये ३०० रुपयांपेक्षा अधिक खरेदी करणाऱ्या ग्राहकांना दुकानदारांकडून  एक कूपन दिले जाईल.

’ ते कूपन भरून दुकानात असलेल्या ‘लोकसत्ता’च्या ड्रॉप बॉक्समध्ये टाकायचे आहे.

’ अर्धवट माहिती भरलेली कूपन्स फेटाळली जातील.

’ ‘ड्रॉप बॉक्स’मध्ये दररोज जमा होणाऱ्या कूपन्समधून दररोज भाग्यवान विजेत्यांची निवड केली जाईल आणि त्याचे नाव ‘लोकसत्ता ठाणे’ आणि ‘लोकसत्ता महामुंबई’मधून प्रसिद्ध केले जाईल.

प्रायोजक

पितांबरी रुचियाना प्रस्तुत ‘लोकसत्ता ठाणे शॉपिंग फेस्टिव्हल’ हा  रिजन्सी ग्रुप आणि ठाणे महापालिका यांच्या सहकार्याने होत आहे. तन्वी, ऑर्बिट, टिप टॉप मिठाईवाला, एम. पांडुरंग हरी वैद्य आणि कंपनी ज्वेलर्स  हे या खरेदी उत्सवाचे असोसिएट पार्टनर आहेत. तर बंधन टूर्स हे ट्रॅव्हल पार्टनर आहेत. रतांशी खेराज सारीज, जीन्स जंक्शन, द रेमंड शॉप, शुभकन्या, अशोक स्वीट्स, दैनिक मालवणी, मॅपल्स सलून हे या खरेदी उत्सवाचे पॉवर्ड बाय प्रायोजक असून डीजी ठाणे हे या उत्सवाचे डिजिटल पार्टनर आहेत. तर या महोत्सवाचे खवय्ये हे फूड पार्टनर, परंपरा हे स्टायलिंग पार्टनर, वोरटेक्स हे वायफाय पार्टनर, डय़ुरेन हे कम्फर्ट पार्टनर, गोल्डन अ‍ॅप्लायन्सेस हे होम अ‍ॅप्लायन्सेस पार्टनर, रिट्झ बँक्वेट्स हे बँक्वेट पार्टनर आणि सरलाज् हे ब्युटी पार्टनर आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 24, 2020 4:10 am

Web Title: prizes on shopping at lokasatta thane shopping festival zws 70
Next Stories
1 वसईतील क्रीडांगणे बेपत्ता
2 वातानुकूलन यंत्रणेत बिघाड झाल्याने २३ बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार
3 पालघर जिल्ह्यत पोलीसबळ अपुरे
Just Now!
X