News Flash

आकाशगंगा रस्त्यावर वाहने थांबविण्यास मनाई

साकेत व क्रिकनाका परिसरातील वाहतूक कोंडी होत आहे.

सूचना, आक्षेप नोंदविण्याचे आवाहन

ठाणे शहारातील मध्यवर्ती कारागृहाच्या संरक्षित भिंतीलगत क्रिकनाका ते क्रांतिनगर राबोडी आकाशगंगा रोडवर तसेच साकेत बाजूकडील रोडवर मोठय़ा प्रमाणात ट्रक, टेम्पो व बसेस अशी वाहने कायम उभी केली जातात. त्यामुळे साकेत व क्रिकनाका परिसरातील वाहतूक कोंडी होत आहे. मध्यवर्ती कारागृहाच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून तसेच वाहतूक कोंडीची उद्भवणारी समस्या टाळून सर्वसामान्य जनतेच्या सोयीसाठी क्रिकनाका ते आकाशगंगा रस्त्यावर क्रांतिनगर नाल्यापर्यंत ठाणे मध्यवर्ती कारागृहाच्या संरक्षित भिंतीलगत बाजूकडील रोडवर सर्व प्रकारची वाहने उभे करण्यास मनाई केली आहे.

या संदर्भात कुणाची काही हरकत अथवा सूचना असल्यास त्या लेखी स्वरूपात पोलीस उपायुक्त, कार्यालय वाहतूक विभाग, तीनहात नाका, ठाणे येथे पाठवाव्यात. याबाबत काही सूचना अथवा आक्षेप प्राप्त न झाल्यास ही अधिसूचना कायम स्वरूपात अमलात राहील. पोलीस वाहने, अग्निशमन यंत्रणा, रुग्णवाहिका व इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनांना ही अधिसूचना लागू राहणार नाही, असे वाहतूक विभागाच्या उपायुक्त डॉ. रश्मी करंदीकर यांनी कळविले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 2, 2016 1:25 am

Web Title: prohibition to stop vehicles on akash ganga road
टॅग : Thane
Next Stories
1 कचरा सपाटीकरण दुपापर्यंत बंद
2 जमीन मालकाची फसवणूक करणाऱ्या विकासकावर गुन्हा
3 ठाण्यात भरदिवसा २५ लाखांची लूट
Just Now!
X