29 September 2020

News Flash

मालमत्ता लपवणाऱ्या अधिकाऱ्यांची ‘वेतनबंदी’

शासकीय अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांना मालमत्तेचे विवरण पत्र दर पाच वर्षांनी सादर करावे लागत होते.

 

५३जणांवर पालिकेची कारवाई

राज्य शासनाने दरवर्षी मालमत्तेचे विवरण पत्र सादर करण्याचे आदेश दिले असतानाही त्याकडे कानाडोळा केल्याप्रकरणी ठाणे महापालिका प्रशासनाने ५३ अधिकारी-कर्मचाऱ्यांचे वेतन रोखण्याची कारवाई केली आहे. या कारवाईमुळे संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

शासकीय अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांना मालमत्तेचे विवरण पत्र दर पाच वर्षांनी सादर करावे लागत होते. मात्र, शासनाने त्यामध्ये फेरबदल करून नवे धोरण आखले. या धोरणानुसार प्रत्येक वर्षी मालमत्तेचे विवरण सादर करण्याचे आदेश शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहेत. ठाणे महापालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल यांनी या धोरणाची अंमलबजावणी करण्याचे आदेश संबंधित विभागाला दिले होते. त्यानुसार संबंधित विभागाने पालिकेतील सर्वच अधिकारी-कर्मचाऱ्यांना विवरण पत्र सादर करण्यास सांगितले होते. मे महिन्याच्या अखेपर्यंत विवरण पत्र सादर करण्याची मुदत होती. मात्र ही मुदत उलटून एक महिन्याचा काळ लोटला तरीही ५३ अधिकारी-कर्मचाऱ्यांनी मालमत्तेचे विवरण पत्र भरून दिले नसल्याची बाब प्रशासनाच्या निदर्शनास आली आहे.

त्यामध्ये वर्ग एक ते तीनमधील अधिकारी-कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. त्यामुळे वेतन रोखण्याचा निर्णय प्रशासनाने घेतल्याने संबंधितांचे धाबे दणाणले आहे.

या संदर्भात महापालिका मुख्यालयाचे उपायुक्त संजय निपाणे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी या वृत्तास दुजोरा दिला. तसेच या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या नावांची यादी करण्यात येत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. ‘त्या’ ५३ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची अधिक माहिती महापालिकेकडून मिळू शकली नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 1, 2016 2:46 am

Web Title: property hiding by many bmc officers
Next Stories
1 रमजान ईद निमित्ताने वाहतुकीत बदल
2 बदलापूरजवळील कोंडेश्वर कुंडात बुडून तरुणीचा मृत्यू
3 मालक-भाडेकरू सहकार्याचा नवा ‘आदर्श’
Just Now!
X