रिपाइं कार्यकर्त्यांकडून प्रांत कार्यालयावर मोर्चा; आमदाराच्या अटकेची मागणी 

भिवंडीतील युवक विकी ढेपे याच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या आरोपींना तातडीने अटक करा आणि भाजप आमदार महेश चौघुले यांची आमदारकी रद्द करण्याच्या मागणीसाठी सोमवारी भिवंडीतील रिपाइं कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला. धामणकर नाक्यापासून सुरू झालेला हा मोर्चा भिवंडी प्रांत कार्यालयापर्यंत काढण्यात आला होता. शहरातील सर्व दलित संघटनांनी या मोर्चामध्ये सहभाग नोंदवला.

lighting on trees for decoration, lighting on trees thane marathi news
ठाणे, कल्याण- डोंबिवली, मिरा भाईंदरमध्ये वृक्षांचा गळा घोटण्याचे कार्य सुरूच, उच्च न्यायालयाच्या नोटीस नंतरही शहरात वृक्षांवर विद्युत रोषणाई
foreign women prostitution, prostitution Kharghar,
वेश्याव्यवसायप्रकरणी परदेशी महिलांवर कारवाई
Love Jihad, pune, Pune University
‘लव्ह जिहाद’च्या आरोपावरून मारहाणप्रकरणी गुन्हा दाखल; पुणे विद्यापीठाच्या आवारातील घटना
scam in milk supply
दूध आणि पोषण आहार पुरवठ्यात कोट्यवधींचा घोटाळा; आमदार रोहित पवार यांचा आरोप

भिवंडीतील वाराळदेवीनगर (कामतघर) येथे मंगळवारी मध्यरात्री भाजप आमदार महेश चौघुले यांच्या समर्थकांनी तीन तरुणांवर प्राणघातक हल्ला केला होता. या हल्ल्यातील जखमी विकी ढेपे या तरुणाचा रविवारी दुपारी जे.जे.रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. रविवारी भिवंडीमधील रिपाइं कार्यकर्त्यांनी भिवंडीत बंद पुकारला. धामणकर नाका परिसरात दुकाने बंद करून निदर्शने करण्यात आली. यावेळी जमावाला आवरण्यासाठी आलेल्या पोलिसांनाही जमावाने लक्ष केले. सोमवारी हजारोच्या संख्येने मोर्चेकरी रस्त्यावर उतरून भाजप सरकारचा निषेध व्यक्त करीत होते. आरोपींना तातडीने अटक करा आणि भाजप आमदारांची आमदारकी रद्द करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.  मोर्चा चौघुलेच्या कार्यालयासमोर आल्यानंतर काही काळ तणावाचे वातावरण होते.