News Flash

जनता ‘स्मार्ट’ झाली पाहिजे!

स्वप्न व कल्पना यांचे वय केव्हाच निवृत्त होऊन आता प्रौढत्वाची चिंतनशीलता आली आहे.

आमच्या स्वप्नातील कल्याण

माझा देश, माझे शहर आणि माझे गाव यांच्या बहुतांशी समस्या एकच आहेत. मी ज्या शहराचा, गावाचा रहिवासी आहे, ते सर्व सुखसोयीने संपन्न निवासस्थान कसे होईल, ही संकल्पना शालेय पातळीवर मांडणे पोरकटपणाचे ठरेल. स्वप्न व कल्पना यांचे वय केव्हाच निवृत्त होऊन आता प्रौढत्वाची चिंतनशीलता आली आहे. समस्या का निर्माण होतात त्याचे चिंतन झाले तरच विधायक आणि निर्णायक उपाय लक्षात येतात. स्वप्नातील कल्याण साकार करायचे असेल तर येथील तळागाळातील माणसापासून ते पालिकेत सर्वोच्च स्थानी बसणाऱ्या राजकीय व्यक्तीने आपली या शहर, समाजाप्रति असणारे दायित्व काय, हे प्रथम ओळखले पाहिजे.

चाळीस वर्षांपासून आपण कल्याण पूर्वमधील तीसगाव भागात राहतो. नेतिवली, पिसवली, खडेगोळवली, काटेमानिवली, तीसगाव ही लहान गावे होती. स्वच्छ मोकळी हवा, मोकळे रस्ते, भातशेती, विहिरीचे कातळाचे थंडगार पाणी असे नयनमनोहरी दृश्य या भागात होते. झपाटय़ाने होणाऱ्या नागरीकरणामुळे हे दृश्य लोप पावले आहे. आता घरातून बाहेर पडल्यानंतर रस्ते शोधावे लागतात. इतकी दामदुप्पट वाहने रस्त्यावरून धावत आहेत. शहरातील गर्दी ती मग वाहने, वाहनतळ, रिक्षा, नागरिक, फेरीवाले, विक्रेते, व्यापारी अशी कोणत्याही वर्गातील असेल. ही गर्दी विकासाच्या मार्गातील मोठी धोंड असते. या गर्दीचे शहराच्या प्रशासनप्रमुख, नियोजनकार, लोकसेवकांनी त्या त्या पातळीवर योग्य नियोजन केले तर शहराचे आखीव रेखीव नियोजन राहिले असते. कल्याण शहराच्या बाबतीत बोलावे तर यू. पी. एस. मदान, टी. चंद्रशेखर, श्रीकांत सिंग हे पालिका आयुक्त सोडले एकही दूरदृष्टीचा प्रशासक या शहराला लाभला नाही.

पक्षीय, राजकीय सामाजिक फायदे-तोटे बाजूला ठेवून शहरांचे नियोजन केले तरच ती शहरे विकासाची पावले चालतात. अन्यथा शहरांचा उकिरडा होतो. गेल्या अनेक वर्षांत कल्याण-डोंबिवली शहरांच्या वाटय़ाला हेच दैन्य आले. माणूस हाच विकासाचा केंद्रबिंदू आहे. त्याला सर्व प्रकारच्या नागरी सुविधा उपलब्ध करून द्या. त्याला त्याची कर्तव्य पटवून द्या. लोकप्रतिनिधी, प्रशासकांनी आपल्या जबाबदाऱ्या वेळच्या वेळी प्रामाणिकपणे पार पाडल्या तर स्मार्ट सिटी होणे खूप अवघड नाही. फक्त इच्छाशक्ती पाहिजे.
अरविंद गायकवाड, (निवृत्त बँक अधिकारी)

 

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 3, 2015 12:08 am

Web Title: public should be a smart
Next Stories
1 खादीचा कॉर्पोरेट अवतार
2 विद्यार्थ्यांनी महात्मा गांधींच्या विचारांची कास धरावी
3 स्मृतींची चाळता पाने
Just Now!
X