News Flash

गर्दुल्ल्याच्या दगडफेकीत रेल्वे प्रवासी जखमी

सकाळी ११.३० च्या दरम्यान कैलास मोरे हा गर्दुल्ला फलाट क्रमांक तीनवर उभा होता.

डोंबिवली स्थानकावरील घटनेने खळबळ
कल्याण रेल्वे स्थानकात सकाळी एका गर्दुल्ल्याने समोरील फलाटावर उभ्या असणाऱ्या प्रवाशांवर दगड फेकून मारल्याने एकच गोंधळ उडाला होता.
सकाळी ११.३० च्या दरम्यान कैलास मोरे हा गर्दुल्ला फलाट क्रमांक तीनवर उभा होता. त्याने फलाट क्रमांक चारवर उभ्या असणाऱ्या प्रवाशांच्या दिशेने दगड भिरकावला. हा दगड भिवंडी येथे राहणाऱ्या दर्शत नारायण रॉय (२५) वर्षीय तरुणाच्या कानाला लागला. फलाटावरील प्रवाशांनी आरडाओरडा केला. तसेच काही प्रवासी व स्थानकातील कुली यांनी त्या गर्दुल्ल्याचा पाठलागही केला. परंतु तो पळून जाण्यात यशस्वी झाला. कल्याण रेल्वे पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमी दर्शत याला रुक्मिणीबाई रुग्णालयात दाखल केले. त्याच्या कानाला दुखापत झाली असून त्यावर उपचार केल्यानंतर सायंकाळी घरी सोडण्यात आले. पोलिसांनी तात्काळ गर्दुल्याचा शोध घेत त्याला ताब्यात घेतले. कैलास मोरे असे त्याचे नाव असल्याचे रेल्वे लोहमार्ग पोलिसांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 4, 2016 12:08 am

Web Title: railway passenger injured at dombivali station
Next Stories
1 ठाणेकरांच्या मालमत्ता करात अखेर वाढ
2 महिला वाहतूक पोलिसाला महिलेकडूनच मारहाण
3 बालभवनजवळील खडीच्या ढिगांमुळे वाहतूक कोंडी
Just Now!
X