News Flash

भाजप थापाड्यांचा पक्ष- राज ठाकरे

भाजप नेते सत्तेत आल्यापासून तोंडाले येईल ते बोलत सुटलेत

MNS chief Raj Thackeray : शस्त्र परवाने देऊन उपयोग नाही, कायद्याचा धाक हवा, असा टोलाही त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला.

भाजप नेते सत्तेत आल्यापासून तोंडाले येईल ते बोलत सुटले असून थापा मारण्यात भाजप नेते पटाईत असल्याची टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शुक्रवारी केली. डोंबिवलीत आयोजित करण्यात आलेल्या पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हजारो कोटींच्या पॅकेजच्या थापा मारण्याचे काम मुख्यमंत्र्यांनी केल्याचे राज यावेळी म्हणाले. ‘थापांना’ पर्यायी शब्द ‘भाजपा’ असल्याचा टोलाही राज यांनी लगावला. भाजपला उमेदवार मिळेनासे झाल्याने पैसे वाटून उमेदवार विकत घेण्याचे काम भाजपकडून सुरू असल्याचा आरोप राज यांनी यावेळी केला. पुतळे उभारत बसण्यापेक्षा आधी जिवंत माणसांकडे लक्ष द्या. छत्रपती शिवाजी महाराजांचा अरबी समुद्रात पुतळा उभारण्याऐवजी महाराजांच्या गडकिल्ल्यांचे संवर्धन करण्याचाही पुनरुच्चार राज यांनी केला.
पंतप्रधान मोदींवरही राज यांनी निशाणा साधला. पुढचं पुढे पाहून घेऊ या मानसिकतेतून शक्यतेच्या पलिकडच्या घोषणा करून टाकायच्या आणि लोकांना अच्छे दिनाच्या स्वप्नांत भूलवायचे काम नरेंद्र मोदी करीत असल्याचे शरसंधान राज यांनी केले. शंभर दिवसांत ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखवणाऱया मोदींना सत्तेत येऊन शंभर दिवस होऊन गेले अजूनही ‘अच्छे दिन’ काही दिसत नाही, असे राज म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 9, 2015 8:53 pm

Web Title: raj thackeray criticises bjp
टॅग : Raj Thackeray
Next Stories
1 कल्याण-डोंबिवली सत्तासंग्राम : दोन्ही काँग्रेसची आघाडी कठीण
2 युतीच्या आशा संपुष्टात? कल्याण-डोंबिवलीत शिवसेनेचा भाजपवर थेट हल्ला
3 सोनसाखळी चोरांची भीती नको, आम्ही समर्थ आहोत!
Just Now!
X