News Flash

मनसे कार्यकर्त्यांना संजीवनी व बळकटीसाठी राज ठाकरेंनी घेतल्या बैठका

आगामी निवडणुकीसाठी मनसेची तयारी?

राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली.

ऐन गणेशोत्सवात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्यात सकाळी आठ वाजता हजेरी लावून पक्षाच्या महत्वाच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर शहनाई हॉल येथे ठाण्यातील विधानसभा क्षेत्रातील कार्यकर्त्यांची सभा घेऊन आगामी निवडणुकीसाठी मनसेत संजीवनी निर्माण करण्यासाठी कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे.

ठाण्यात लोकसभा, विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला साधे खातेही खोलता आले नाही. मात्र, आता हा पराभव विसरून आगामी निवडणूका लक्षात घेवून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये संजीवनी निर्माण करण्यासाठी आणि पक्ष बळकटीसाठी रविवारी पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सकाळपासून कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या विभागवार बैठका घेऊन कार्यकार्त्यांशी विचार विनिमय केले.

या बैठकानंतर पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये आवश्यक बदल देखील केले जाणार आहेत. स्थानिक समस्या, त्यासाठी आवश्यक उपाययोजना आणि कार्यकर्त्यांना वेळोवळी मार्गदर्शन देखील राज ठाकरे करणार असल्याची माहिती मनसेच्या कार्यकर्त्यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 27, 2017 5:50 pm

Web Title: raj thackerays meetings with party workers for sanjivani and strengthen
Next Stories
1 ठाण्याजवळ घोडबंदर रोडवर कंटेनर उलटला; चालकाचा जागीच मृत्यू
2 डोंबिवलीत इमारतीला भीषण आग; कापडाच्या गोडाऊनसह प्रिंटींग प्रेस जळून खाक
3 ठाण्यात ३ हजार स्वस्त घरे!
Just Now!
X