महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकांच्या वेळी मनसेने महाराष्ट्राची ‘ब्लू प्रिंट’ दाखवून प्रचार केला. भाजपकडून गुजरातमध्ये ‘ब्लू फिल्म’ दाखवून प्रचार केला जातो आहे अशा तिखट शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपवर शरसंधान केले आहे. ठाण्यात झालेल्या प्रचार सभेत त्यांनी ही घणाघाती टीका केली. एवढेच नाही तर काँग्रेसच्या राहुल गांधींना ‘पप्पू’ समजता तर मग भाजपच्या नेत्यांची फौज गुजरातमध्ये येऊन काँग्रेसविरोधात का बोलते आहे? असा प्रश्नही राज ठाकरेंनी विचारला आहे. भाजप सरकारने सत्तेवर येण्यापूर्वी अनेक आश्वासने दिली होती. त्यापैकी किती आश्वासने पूर्ण झाली? सरकारडून महत्त्वाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याचा  आरोपही राज ठाकरेंनी केला.

गुजरात निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पाटिदार समाजाचा नेता हार्दिक पटेल याची कथित सेक्स सीडी बाहेर आली. यावर राज ठाकरेंनी सडकून टीका केली. तसेच तुम्ही सत्तेचा अमरपट्टा घेऊन आलेला नाहीत हे लक्षात ठेवा असा इशाराही राज ठाकरेंनी दिला. मनसेला एकटे पाडण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक होतो आहे. मात्र महाराष्ट्राची जनता आमच्यासोबत आहे हे विसरू नका असेही राज ठाकरेंनी म्हटले आहे. तसेच आजवर मनसेने एकही आंदोलन चुकीच्या गोष्टीसाठी केलेले नाही आमचे प्रत्येक आंदोलन जनतेच्या प्रश्नांसाठीच आहे असेही राज ठाकरेंनी म्हटले आहे.

narendra modi
धर्माच्या आधारावर आरक्षणाचा प्रयत्न! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काँग्रेसवर आरोप
BJP tukde-tukde gang Kanhaiya Kumar interview delhi lok sabha election
“मी तुकडे-तुकडे गँगचा असेन तर मोदी मला अटक का करत नाहीत?”; कन्हैयाचं भाजपाला आव्हान
K Annamalai is in limelight due to Kachathivu island case
विश्लेषण : ‘दक्षिणेतील सिंघम’, ‘कचाथीवू हिरो’… के. अण्णामलाई भाजपला तमिळनाडूत यश मिळवून देणार का?
india bloc, india bloc rally
जागावाटपावरून मतभेद, तरीही व्यासपीठावर एकत्र; ‘इंडिया’ आघाडीकडून एकजूट दाखवण्याचा प्रयत्न?

जिथे कौतुक करायचे आहे तिथे मी भाजपचे कौतुक करेन मात्र जे चूक आहे तिथे प्रहार करणारच. गुजरातमध्ये विकास काय केला ते दाखवा? हार्दिक पटेलला त्याचे व्यक्तिगत आयुष्य जगूद्या त्याच्या आयुष्यात तुम्ही का डोकावता? विकास दाखवून मतं मागा सीडी कशाला बाहेर आणता? असाही प्रश्न राज ठाकरेंनी ठाण्यातील सभेत विचारला.