News Flash

ठाण्याच्या मनोरुग्णालयात ‘रक्षाबंधन’ साजरा

विठाई प्रतिष्ठानच्यावतीने रक्षाबंधन महोत्सवाचे आयोजन

संग्रहित छायाचित्र

मानसिक स्थिती ठीक नसलेल्या ठाण्याच्या मनोरुग्णनालायात आज बहीण आणि भाऊ यांच्या प्रीतीचा संगम असणारा रक्षाबंधन सण मोठ्या थाटामाटात साजरा झाला. आपल्या घरच्यांपासून दूर असलेल्या मनोरुग्णांनी राखी बांधून रक्षाबंधनाचा सण साजरा केला. यावेळी मनोरुग्णांच्या चेहऱ्यावर एक स्मितहास्य पाहायला मिळाले. दरम्यान रुग्णालयातील रुग्णांनी गाणी गाऊन आणि तोंड गोड करून आपला आनंद व्यक्त केला. विठाई प्रतिष्ठानच्यावतीने या रक्षाबंधन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

ठाण्यातील रुग्णालयात ‘विठाई प्रतिष्ठान’ या संस्थेच्यावतीने रक्षा बंधनाचा उत्सव साजरा करण्यात आला. मनोरुग्ण असणाऱ्या बांधवांच्या चेहर्यावर आज रक्षाबंधनाच्या पूर्व संध्येलाच आनंद ओसंडून वाहत होता. आजचा सण साजरा करत असताना या ठिकाणी असणाऱ्या भावांनी आपल्या सुप्तगुणांची चुनूकही दाखवली. यावेळी गायलेल्या ‘खेळ मांडला’ या गीताने सर्वजण मंत्रमुग्ध झाले होते.

घरातील माणसांची आठवण येत असतानाच येथील मनोरुग्ण असणाऱ्या बहिणींबरोबर रक्षाबंधन साजरा केला जात असल्याबद्दल बहिणींनी या सोहळ्याबद्दल आभार व्यक्त केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 6, 2017 5:10 pm

Web Title: raksha bandhan celebrated at thane mental hospital
Next Stories
1 ठाण्यात ‘मराठा क्रांती मोर्चा’च्या बाईक रॅलीचे आयोजन
2 रन फॉर… ‘चले जाओ’ : ठाण्यात क्रांती दौडचे आयोजन
3 महिला कैद्यांच्या राख्यांना जास्त मागणी
Just Now!
X