ज्येष्ठ नाटककार राम गणेश गडकरी यांच्या पुतळ्याच्या विटंबनेचा वाद येथील साहित्य संमेलनात होण्याची शक्यता आहे. पुण्यात गेल्या महिन्यात ज्येष्ठ नाटककार राम गणेश गडकरी यांच्या पुतळ्याची विटंबना काही समाजकंटकांनी केली. त्या घटनेचे अतिशय तीव्र पडसाद सांस्कृतिक आणि साहित्यिक क्षेत्रात उमटले होते. साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाच्या दिवशीच या घटनेला एक महिना होत असून त्यानिमित्ताने जोरदार निषेध केला जाण्याची तयारी एका गटाकडून सुरू आहे.

यासंदर्भात रसिकांकडून प्रतिक्रिया मागविल्या जात आहेत. त्यावर आतापर्यंत ४०० जणांनी मतेही नोंदवली आहेत. संमेलनात या घटनेचा निषेध करणारा ठराव मांडण्यात यावा, यासाठी दबाव निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे. बुधवारी दिवसभर हा संदेश फेसबुक, व्हॉटस्अ‍ॅपवर फिरत होता. त्याला रसिकांकडून चांगला प्रतिसादही मिळू लागला आहे.

किमान भविष्यात अशा प्रकारे कोणत्याही साहित्यिकाचा अपमान केला जाऊ नये, यासाठी अशा प्रकारचा निषेध ठराव आवश्यक असल्याचे गडकरीप्रेमींचे म्हणणे आहे. भविष्यात कोणत्याही साहित्यिकाच्या बाबतीत असे होऊ नये यासाठी ही चळवळ आम्ही सुरू केली असून, त्यासाठी काय करायला हवे याचाही विचार सुरू आहे. संमेलनाचे अध्यक्ष डॉ. अक्षयकुमार काळे यांची आम्ही यासंदर्भात भेट घेणार आहोत. आमच्या भावना आम्ही त्यांच्यापुढे मांडू. त्यांच्या परवानगीने हा निषेध ठराव संमेलनात मांडला जावा, अशी आमची इच्छा असल्याचे या चळवळीचे म्होरके अविनाश बोंद्रे यांनी सांगितले.

संमेलनात या घटनेचा निषेध करणारा ठराव मांडण्यात यावा, यासाठी दबाव निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे. बुधवारी दिवसभर हा संदेश फेसबुक, व्हॉटस्अ‍ॅपवर फिरत होता. त्याला रसिकांकडून चांगला प्रतिसादही मिळू लागला आहे.