News Flash

पोलिसांच्या चुकीमुळे बलात्कारातील आरोपी पसार

कळवा येथील भास्करनगर परिसरातील एका चाळीत पीडित १७ वर्षीय मुलगी राहते.

पोलिसांच्या चुकीमुळे बलात्कारातील आरोपी पसार

चौकशीसाठी परतण्याची बतावणी करीत फरार

कळवा येथील भास्करनगर परिसरातील एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार करणारा आरोपी इम्रान खान हा पोलिसांच्या एका चुकीमुळे निसटल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कळवा पोलिसांनी गुरुवारी रात्री इम्रानला चौकशीसाठी ताब्यात घेतले, मात्र पीडित मुलगी भिवंडी बालसुधारगृहात असल्यामुळे तिला रात्रीच्या वेळेस ओळख पटविण्यासाठी पोलीस ठाण्यात आणणे शक्य नव्हते. नेमकी हीच संधी साधत सकाळी पुन्हा चौकशीसाठी येतो, आता मात्र सोडा, अशी विनंती त्याच्या भावाने पोलिसांकडे केली. त्यानुसार पोलिसांनी इम्रानला सोडले आणि त्यानंतर मात्र तो फरारी झाला, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

कळवा येथील भास्करनगर परिसरातील एका चाळीत पीडित १७ वर्षीय मुलगी राहते. याच परिसरात इम्रान राहत असून तो पाणी बिले वाटण्याची कामे करतो. त्याच्यासोबत पीडित मुलीची ओळख झाली होती. या दोघांच्या प्रेमप्रकरणाची माहिती मिळताच पीडित मुलीच्या आईने तिला उत्तर प्रदेशातील बलिया या गावी एका नातेवाईकाकडे पाठविले होते. काही दिवसानंतर तिचा माग काढत इम्रानही त्या गावात पोहचला. त्यानंतर त्याने लग्नाचे आमिष दाखवून तिला पळवून नेले. उत्तर प्रदेशातील एका मित्राच्या घरी नेऊन तिथे त्याने २२ दिवस तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. काही दिवसांपूर्वी तिला नालासोपारा भागातील एका घरी घेऊन आला आणि तिथेही त्याने तिच्यावर अत्याचार केला. या घरामध्ये तिला कोंडून ठेवले होते. या घराची चावी त्याने एका ओळखीच्या मुलीकडे दिली होती. या मुलीसोबत मैत्री करत २७ ऑगस्ट रोजी तिने घरातून स्वत:ची सुटका केली. याप्रकरणी तिने दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 11, 2016 2:28 am

Web Title: rape accused escapes from police station
Next Stories
1 भिवंडी दंगलीतील १७ आरोपींची मुक्तता
2 भिवंडीत पोलिसांना जिवंत जाळणाऱ्या १८ आरोपींची पुराव्याअभावी निर्दोष सुटका
3 वृक्षतोड र्निबधांवर पळवाटांची कुऱ्हाड
Just Now!
X