19 January 2021

News Flash

पोलीस उपनिरीक्षकावर बलात्काराचा आरोप

लग्नाचे आश्वासन देऊन तरुणीवर बलात्कार केल्याचा आरोप मुंब्रा पोलीस ठाण्यातील एका उपनिरीक्षकावर करण्यात आला आहे. या प्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून

लग्नाचे आश्वासन देऊन तरुणीवर बलात्कार केल्याचा आरोप मुंब्रा पोलीस ठाण्यातील एका उपनिरीक्षकावर करण्यात आला आहे. या प्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून हा गुन्हा पुणे पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.
पुण्यातील एका तरुणीने तिच्यावर संतोष सोनवणे (३०) या पोलीस उपनिरीक्षकाने बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. सोनवणे याने बीएस्सीच्या पुढील शिक्षणासाठी महाविद्यालयात प्रवेश मिळवून देतो असे सांगत तसेच लग्नाचे आश्वासन देत आपल्यावर अत्याचार केल्याचा आरोप संबंधित तरुणीने केला आहे. पीडित तरुणी पुण्यातील हडपसर भागात राहणारी असून राहत्या घरीच सोनवणे याने अत्याचार केल्याचा तिचा आरोप आहे. १३ ते २६ एप्रिलदरम्यान हा प्रकार घडला आहे, अशी तक्रार पीडित तरुणीने दिली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 28, 2016 12:01 am

Web Title: rape allegation on police inspector
टॅग Police Inspector
Next Stories
1 ‘मराठी’चे विद्यार्थी शोधताना गुरुजींची दमछाक!
2 कळव्यातील रस्ता रुंदीकरणात सर्वपक्षीय अडसर
3 डॉ. काशिनाथ घाणेकर नाटय़गृहावर महिनाभर ‘पडदा’
Just Now!
X