14 December 2018

News Flash

दुर्मीळ पुस्तकांचे नेटके जतन

एक हजार ७७७ पुस्तकांचे डिजिटल स्वरूपात जतन करण्याचा निर्णय घेतला आहे.

पुस्तकांच्या ई-आवृत्तीसाठी रोज दहा हजार पृष्ठे ‘स्कॅनिंग’चे उद्दिष्ट आहे.

ठाणे ग्रंथसंग्रहालयाच्या आधुनिकीकरणासाठी पाऊल

भावी पिढय़ांना दुर्मीळ ग्रंथसंपदा नीटपणे हाताळता यावी, या हेतूने मराठी ग्रंथसंग्रहालय, ठाणे या संस्थेने त्यांच्या संग्रही असलेल्या एक हजार ७७७ पुस्तकांचे डिजिटल स्वरूपात जतन करण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारी जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या उपस्थितीत या आधुनिकीकरणाची सुरुवात करण्यात आली.

या ग्रंथसंग्रहालयातील इतर पुस्तकांचे डिजिटल स्वरूपात जतन करण्यासाठी तसेच पुस्तकांचे वैशिष्टय़पूर्ण संकेतस्थळ विकसित करण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे साहाय्य केले जाईल, असे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी या वेळी दिले. ग्रंथालयामध्ये सध्या उपलब्ध असलेल्या दुर्मीळ पुस्तकांची काही पाने जीर्ण होऊ लागली आहेत. जुन्या आणि दुर्मीळ पुस्तकांना हाताळणेही कठीण झाले आहे. ही पुस्तके वाचकांना उपलब्ध असावी म्हणून या पुस्तकांचे डिजिटायझेशन होणे महत्त्वाचे आहे, असे डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी या वेळी सांगितले.एकूण १८ लाख पाने डिजिटल पद्धतीने जतन करावी लागणार आहेत. त्यातील तीन लाख पृष्ठे पहिल्या टप्प्यात ई आवृत्तीमध्ये रूपांतरित केली जातील. सध्या दररोज दहा हजार पृष्ठे स्कॅन करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. राहुल गुंजाळ आणि श्रीनिवास कोंगे संचालित ईक्यूएल कंपनीला हे काम देण्यात आले आहे.

दुर्मीळ पुस्तकांचा खजिना

दुर्मीळ पुस्तकांची एकूण पृष्ठसंख्या २ लाख ९० हजार ७१० आहे.  त्यातील काव्य प्रकाराची ३४४, नाटक- २२८, इतिहास- १९४, निबंध- १७८,  चरित्र- १४९, १४३ कादंबऱ्या, ७७ संकीर्ण, अध्यात्म ५१, धर्मावर आधारित ५२, वैद्यक ५१, गणितशास्त्राची ४४, पौराणिक ४१, शब्दकोश १६ आणि इतर पुस्तकांचा समावेश आहे.

जतन असे..

’ प्रारंभी पुस्तक स्कॅनरसमोर पूर्ण उघडे करून ठेवण्यात येते. त्यामुळे उघडलेल्या दोन्ही कागदांचे स्कॅन एकदमच केले जाते.

’ स्कॅन झालेल्या संपूर्ण पुस्तकाचा दर्जा तपासून आवश्यक तो भाग दुरुस्त केला जातो. अंतिम मसुदा पीडीएफ व जेपीजीमध्ये रूपांतरित करून सव्‍‌र्हरवर सेव्ह केला जातो.

First Published on November 15, 2017 2:42 am

Web Title: rare books saved in thane library
टॅग Rare Books