जुन्याच किमतीत पदार्थाची पाकिटे उपलब्ध

वाढत्या महागाईमुळे दिवाळीनिमित्त बाजारातील उत्साहाला यंदा काहीशी काटकसरीची झालर लागली असली तरी डोंबिवलीतील रेडीमेड फराळाच्या ग्राहकांना या महागाईची झळ बसण्याची शक्यता नाही. शहरी भागातील गरज म्हणून वाढत चाललेल्या रेडीमेड फराळाच्या बाजारातील पदार्थाच्या किमतीत फार बदल झाला नसल्याने जवळपास गेल्या वर्षीच्या किमतीत ग्राहकांना या फराळांची पाकिटे उपलब्ध होतील, असा दावा विक्रेत्यांनी केला आहे.
दिवाळीला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने ग्राहकांच्या दिवाळी खरेदीला सुरुवात झाली आहे. दुकानांतही तयार फराळांच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील, अशा पद्धतीचे फलक पंधरा दिवसांपूर्वीच लागले आहेत. डोंबिवलीतील अनेक कुटुंबातील मुले नोकरी व शिक्षणानिमित्त परदेशी आहेत. त्यामुळे परदेशात आपल्या मुलांना फराळ पाठविण्यासाठी ग्राहकांची दुकानात लगबग सुरू असते. अर्थात परदेशातील फराळांच्या ऑर्डस् काही दिवसांपूर्वीच रवाना झाल्या आहेत. तर आता रेडीमेड फराळांच्या दुकानांत स्थानिक ग्राहकांची गर्दी होऊ लागली आहे. या संदर्भात सुरस फूड्सचे सुनील शेवडे म्हणाले, ‘फराळाच्या किमतीत वाढ झालेली नाही. केवळ एक-दोन पदार्थाच्या किमतीत ५ ते १० टक्क्यांची वाढ झालेली आहे. आत्तापर्यंत ५०० हून अधिक ग्राहकांच्या ऑर्डर्स आमच्याकडे आहेत. ’
कुलकर्णी ब्रदर्सच्या गीता कुलकर्णी म्हणाल्या, ‘१५ ते १७ देशांत आम्ही फराळ पाठवितो. ३ किलो फराळासाठी ६ ते ७ हजार, ५ किलो फराळासाठी ७ ते ८ हजार, ७ किलो ८ ते ९ हजार रुपये खर्च होते. या किमती गेल्या वर्षीच्याच असून आम्ही त्यात वाढ केलेली नाही.’

Change in traffic route due to Rath Yatra after ram navami in nashik
नाशिक : रथयात्रेमुळे वाहतूक मार्गात बदल
life of fish, fish in river, fish danger,
नदी, तलावातील माशांचे आयुष्य का धोक्यात आलंय? काय आहे नवं संशोधन?
Maldhok birds
अग्रलेख: पूतनामावशीचे पर्यावरणप्रेम!
navi mumbai, Water Supply Worker, neglect, Leads to Flood Like Situation, main valve broke, water entered the chalwl, water supply workers slept, water waste, kopar khairane news, navi mumbai news, water news, marathi news, water leakage in kopar khairane,
नवी मुंबई : निष्काळजीपणामुळे लाखो लिटर पाण्याची नासाडी, कर्मचाऱ्यांची झोप नडली; रहिवाशांनी रात्र जागून काढली

पदार्थ किलो- किंमत
नग
करंजी १ नग  २० रु.
अनारसे १ नग  १५ रु.
बेसन लाडू १२ नग  २२० रु.
रवा लाडू १२ नग  २२० रु.
भाजणी चकली २०० ग्रॅ.  ६० रु.
कडबोळी १ कि.   ३०० रु.
चिवडा स्पेशल १ कि.  २४० रु.
तिखट शेव १ कि.  २४० रु.
शंकरपाळे १ कि.   २८० रु.
चिरोटे १ किलो      ३५० रु.