22 January 2021

News Flash

दिराच्या बदलीसाठी अधिकाऱ्याला मारहाण

भदाणे यांनीही सरकारी कामात अडथळा आणला असल्याची तक्रार पोलीस ठाण्यात केली आहे.

आपल्या नातेवाईकाची उद्यान विभागातून महापालिका मुख्यालयात बदली होत नसल्याने संतापलेल्या राष्ट्रवादी कँाग्रेसच्या ब्लॉक अध्यक्षा प्रिया गुप्ता यांनी उल्हासनगर महापालिकेतील सामान्य प्रशासन विभागातील सहाय्यक आयुक्त युवराज भदाणे यांच्या श्रीमुखात भडकाविल्याने एकच खळबळ उडाली आहे. या घटनेचे तीव्र पडसाद उमटले असून मारहाणीच्या निषेधार्थ सर्व कामगार संघटनांनी काम बंद आंदोलन केल्याने महापालिकेचे कामकाज ठप्प झाले होते.

दरम्यान, प्रिया गुप्ता यांनी भदाणे यांनी आपला विनयभंग केला असल्याची तक्रार पोलीस ठाण्यात केली. भदाणे यांनीही सरकारी कामात अडथळा आणला असल्याची तक्रार पोलीस ठाण्यात केली आहे. कर्मचाऱ्यांच्या बदलीसाठी कोणीही राजकीय पदाधिकारी महापालिका अधिकाऱ्यांवर दबाव आणून, मारहाण, अरेरावी करीत असेल तर त्यांना कर्मचारी संघटनेचे सदस्य चोप दिल्याशिवाय राहणार नाहीत, असा इशारा कामगार संघटनेचे नेते श्याम गायकवाड यांनी दिला आहे.

राष्ट्रवादीच्या प्रिया गुप्ता यांचा दीर सुनील गुप्ता हे उल्हासनगर महापालिकेत सुरक्षा रक्षक म्हणून नोकरीला आहेत. ते उल्हासनगर कॅम्प ४ मधील जिजामाता उद्यान येथे कार्यरत आहेत. त्यांची बदली महापालिका मुख्यालयात व्हावी म्हणून प्रिया प्रयत्नशील होत्या. प्रयत्न करूनही बदली होत नसल्याने प्रिया नाराज होत्या. या बदलीत सामान्य प्रशासन विभागातील साहाय्यक आयुक्त भदाणे हे अडथळे आणत आहेत, असे त्यांचे म्हणणे होते. ते बदलीसाठी पैसे मागत असल्याचा आरोप प्रिया करीत होत्या.

गुरुवारी सकाळी प्रिया महापालिका मुख्यालयात आल्या त्यावेळी भदाणे हे उपायुक्त नितीन कापडणीस यांच्या दालना बाहेर उभे होते. प्रिया यांनी थेट भदाणे यांच्यासमोर जाऊन त्यांना जाब विचारण्यास सुरुवात केली. या दोघांमध्ये चर्चा सुरू असतानाच प्रिया यांनी भदाणे यांच्या कानशिलात लगावली. हा प्रकार घडताच भदाणे यांच्याभोवती सुरक्षा रक्षकांनी कडे केले. त्यानंतरही प्रिया आक्रमकपणे भदाणे यांच्या अंगावर धावून जात होत्या.  सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हा सगळा प्रकार कैद झाला आहे.  बदली प्रकरणाचे अधिकार आपणाकडे नाहीत. आपणास हे प्रकरण माहिती नाही असे सांगत भदाणे यांनी पैसे मागितल्याचा आरोप फेटाळून लावला. दरम्यान, अधिकाऱ्याला मारहाण झाल्याने सर्व कर्मचारी संघटनांनी बंद पुकारून राष्ट्रवादीचा निषेध व आपल्या अधिकाऱ्याची पाठराखण केली.

बदली किंवा अन्य कोणतेही प्रकरण अधिकाऱ्याकडून होत नसेल, तर संबंधितांनी आपल्याशी संपर्क साधावा. कायदा हातात घेऊन मारहाण वगैरे करणे सर्वथा गैर आहे. यापुढे असे प्रकार घडणार नाहीत याची काळजी घेतली जाईल.

मनोहर हिरे, उल्हासनगर महापालिका आयुक्त

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 2, 2016 1:54 am

Web Title: regarding authority assaulted for transfer of husband brother
टॅग Transfer
Next Stories
1 आईच्या मृत्यूनंतर अनाथ मुलांना भरपाई
2 राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेत ठाण्याचे यश
3 गुरुवर्य दत्तात्रय मेहेंदळे यांचा ठाण्यात गौरव सोहळा
Just Now!
X