तीन महिन्यापासून उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांमध्ये नोंदणी पुस्तिकांची मागणी करणाऱ्या वाहनचालकांना संदेश पाठवून आपली नोंदणी पुस्तके (आर. सी. बुक) घेऊन जाण्याच्या  सूचना दिल्या जात आहेत. राज्यातील सर्वच उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांमधील सुमारे ३२ हजार वाहनचालकांना नोंदणी पुस्तिका देण्याची कामे ठप्प पडली होती.

‘लोकसत्ता’मध्ये याबाबतचे वृत्त प्रकाशित झाल्यानंतर परिवहन विभागाची धांदल उडाली होती.यावेळी तत्कालिन परिवहन आयुक्तांना आरटीओ कार्यालयांमधील अनागोंदी संपुष्टात आणताना आरटीओ कार्यालयांमधून वाहनचालक, मालकांना देण्यात येणाऱ्या ‘स्मार्ट कार्ड’ योजनेतील गैरप्रकार उघडकीस आणताना  स्मार्ट कार्ड वितरित करणाऱ्या एजन्सीचे काम बंद करण्यात आले होते.

या प्रकरणीचे वृत्त प्रकाशित होताच, परिवहन विभागाने आर.सी. बुक वाटपाचा कार्यक्रम सुरू केला आहे.