08 March 2021

News Flash

ठाण्यात ‘रेमडेसिविर’चा काळाबाजार करणारी टोळी अटकेत

सर्वजण मुंबई आणि नवी मुंबई भागातील रहिवासी आहेत

संग्रहित छायाचित्र

करोनाबाधित रुग्णांसाठी उपयुक्त ठरत असलेल्या रेमडेसिविर आणि टोसिलिझुमॅब औषधांचा काळाबाजार करणाऱ्या पाचजणांच्या टोळीला ठाणे खंडणी विरोधी पथकाने अन्न व औषध प्रशासनाच्या मदतीने अटक केली आहे.

अरुण सिंग (३५), सुधाकर गिरी (३७), रवींद्र शिंदे (३५), वसीम शेख (३२) आणि अमिताभ दास (३९) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. हे सर्वजण मुंबई आणि नवी मुंबई भागातील रहिवासी आहेत.

नवी मुंबईतील एक टोळी या औषधांचा काळाबाजार करीत असून ती ठाण्यातील तीन हात नाका भागात औषधांच्या विक्रीसाठी येणार असल्याची माहिती ठाणे खंडणी विरोधी पथकाला मिळाली होती. त्याआधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार कोथमिरे यांनी पथकासह अन्न व औषध प्रशासनाच्या मदतीने सापळा रचून अरुण, सुधाकर आणि रवींद्र या तिघांना अटक केली. चौकशीदरम्यान नवी मुंबई येथील कामोठे भागात राहणाऱ्या वसीम आणि अमिताभ यांच्याकडून ही औषधे घेतल्याची माहिती तिघांनी पोलिसांना दिली. या दोघांनी ही औषधे वडाळा भागातील एका व्यक्तीकडून घेतली असून त्याचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 23, 2020 12:26 am

Web Title: remedicivir black market gang arrested in thane abn 97
टॅग : Coronavirus
Next Stories
1 काढय़ांमुळे आल्याला चढा भाव
2 सततच्या टाळेबंदीने चप्पल, बॅगविक्रेत्यांची परवड
3 नालासोपाऱ्यात संतप्त प्रवाशांचा रेल्वे ट्रॅकवर उतरुन गोंधळ
Just Now!
X