News Flash

पंचायत समिती सभापती पदासाठी आरक्षण जाहीर

पालघर पंचायत समिती सभापतीचे पद अनुसूचित जमाती महिलांसाठी आरक्षित झाल्याची घोषणा याप्रसंगी करण्यात आली.

पालघर अनुसूचित जमाती, वसई ओबीसी महिलेसाठी आरक्षित

पालघर : पंचायत समितीच्या सभापती पदासाठी गुरुवारी आरक्षण जाहीर झाले. पालघर पंचायत समितीचे सभापती पद अनुसूचित जमातीच्या महिला उमेदवारांसाठी आरक्षित झाले आहे. वसई पंचायत समितीचे सभापती पद नागरिकांच्या मागास प्रवर्ग महिलांसाठी (ओबीसी) आरक्षित राहणार आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे झालेल्या आरक्षण सोडतीच्या कार्यक्रमात जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांच्या उपस्थितीत शालेय विद्यार्थ्यांच्या हातून आरक्षण चिठ्ठय़ा काढण्यात आल्या. त्यामध्ये वसई पंचायत समिती सभापती पद नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला तर पालघर पंचायत समिती सभापतीचे पद अनुसूचित जमाती महिलांसाठी आरक्षित झाल्याची घोषणा याप्रसंगी करण्यात आली.

डहाणू, तलासरी, वाडा, विक्रमगड, जव्हार व मोखाडा या पंचायत समितीचे सभापती पद अनुसूचित जमातीकरिता राखीव ठेवण्यात आले होते. गेल्या वेळच्या सभापतींच्या आरक्षणात चक्रानुक्रमे बदल करण्यात आले. त्यानुसार मोखाडा, डहाणू व विक्रमगड येथे अनुसूचित जमातीच्या महिला सभापती तर जव्हार, वाडा व तलासरी येथे अनुसूचित जमातीच्या सभापतींची निवडणूक आगामी काळात होणार आहे.

या आरक्षण सोडतीला पालघर जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, उपजिल्हाधिकारी डॉ. किरण महाजन, उपजिल्हा निवडणूक अधिकारी संदीप कळंबे आदी मान्यवर उपस्थित होते.

पंचायत समिती सभापतीसाठी आरक्षण

  •  पालघर- अनुसूचित जमाती महिला
  •   मोखाडा- अनुसूचित जमाती महिला
  •  डहाणू- अनुसूचित जमाती महिला
  •  विक्रमगड- अनुसूचित जमाती महिला
  • जव्हार- अनुसूचित जमाती
  •  वाडा- अनुसूचित जमाती
  •   तलासरी- अनुसूचित जमाती
  • वसई- नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 31, 2020 12:10 am

Web Title: reservation for the post of chairman of the panchayat committee akp 94
Next Stories
1 मालमत्ता कराची १६९ कोटींचीच वसुली
2 स्टिरॉईडमुळे २३ वर्षीय तरुणाचा मृत्यू, बॉडी कमावण्याच्या नादात गमावला जीव
3 आधारवाडीतील आगीने कल्याण अंधारले!
Just Now!
X