News Flash

ठाण्यात ११३ ठिकाणे प्रतिबंधित

नौपाडा, कोपरी, मुंब्य्रात प्रत्येकी २२ परिसर

(संग्रहित छायाचित्र)

नौपाडा, कोपरी, मुंब्य्रात प्रत्येकी २२ परिसर

ठाणे : ठाणे महापालिका हद्दीत करोनाच्या रुग्णांचा आकडा चारशेच्या पलीकडे पोहोचला असून शहरात ११३ ठिकाणी प्रतिबंधित क्षेत्र जाहीर करण्यात आले आहे. नौपाडा-कोपरी तसेच मुंब्रा प्रभाग समिती क्षेत्रात प्रत्येक २२ ठिकाणे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आली आहेत.

ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये गेल्या काही दिवसांपासून करोनाबाधित रुग्ण संख्येत वाढ होत असल्याने रुग्ण आढळलेले परिसर टाळेबंद केले जात आहेत. करोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आल्यानंतर प्रतिबंधित क्षेत्रातील निर्बंध हटविण्यात येतात. मात्र काही प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये अजूनही रुग्ण आढळून येत असल्याने तेथील निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत. या क्षेत्रासह नव्याने घोषित करण्यात आलेल्या प्रतिबंधित क्षेत्रांची महापालिका प्रशासनाने प्रभाग समितीनिहाय यादी तयार केली आहे.

ठाणे शहराच्या मध्यवर्ती भागातील नौपाडा-कोपरी प्रभाग समिती क्षेत्रामध्ये २२ ठिकाणे प्रतिबंधित क्षेत्र आहेत. त्यात नौपाडय़ातील चरई, हरीनिवास, कोर्ट नाका पोलीस लाइन, टेंभीनाका, प्रशांतनगर, कोपरी ब्रीज परिसर, नागसेन नगर, राम मारुती रोड, गावदेवी बस आगार या भागातील अनेक इमारती तसेच परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आले आहेत. याशिवाय, प्रभाग समिती क्षेत्रातील रहेजा गार्डन, हाजुरी, रघुनाथनगर, आनंदनगर, महागिरी, चेंदणी कोळीवाडा, सिद्धिविनायक मंदिर कोपरी, कोपरी गाव या भागांतील अनेक इमारती तसेच परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 6, 2020 4:11 am

Web Title: restricted areas declared in 113 places in the thane city zws 70
Next Stories
1 ठाण्यात सुसज्ज इमारतींमध्ये कोविड रुग्णालय
2 मद्य खरेदीसाठी मुलुंड, भिवंडीकडे धाव
3 क्रिकेट, नृत्य, अभिनयाचे ऑनलाइन धडे
Just Now!
X