15 July 2020

News Flash

रिक्षा भाडेवाढीची टांगती तलवार?

दोन रुपयांच्या भाडेवाढीसाठी रिक्षा संघटनांचा तगादा

(संग्रहित छायाचित्र)

दोन रुपयांच्या भाडेवाढीसाठी रिक्षा संघटनांचा तगादा

ठाणे : गेली दोन महिने व्यवसाय बंद असल्याने संकटात सापडलेल्या रिक्षा चालकांनी आता भाडेवाढीसाठी तगादा लावला आहे. रिक्षा वाहतुकीची परवानगी मिळताच राज्य सरकारने प्रती किलोमीटर दोन रुपयांची भाडेवाढ करण्यास परवानगी द्यावी, असा प्रस्ताव ठाण्यातील रिक्षा संघटनांनी परिवहन विभागापुढे ठेवला आहे.

या संबंधीचे पत्र संघटनेने सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्याकडे पाठविले. त्यामुळे येत्या काळात

ठाणे जिल्ह्य़ातील रिक्षा प्रवाशांसमोर रिक्षा भाडेवाढीची टांगती तलवार असणार आहे.

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रिक्षा व्यवसाय काही काळ बंद करण्याचा निर्णय सरकाने घेतला होता. त्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून जिल्ह्य़ातील सर्वच रिक्षा वाहतूक बंद करण्यात आली आहे. याचा फटका रिक्षा चालकांना बसला आहे. या आर्थिक संकटातून सावरण्यासाठी जिल्ह्य़ातील रिक्षा व्यवसाय सुरू करून प्रतिकिलोमीटर दोन रुपयांच्या भाडेवाढीची मागणी ठाणे ऑटोरिक्षा मेन्स युनियनने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्याकडे केली आहे.

अनेक रिक्षा चालकांनी कर्ज काढून रिक्षा घेतल्या आहेत. त्याचे मासिक कर्जाचे हप्ते फेडणे, घरभाडे, विजेचे देयक भरणे यामुळे रिक्षा चालक आर्थिक संकटात सापडलेला असल्याने ही भाडेवाढीची मागणी केली असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. त्यामुळे जिल्ह्य़ातील रिक्षा व्यवसाय सुरू झाल्यानंतर रिक्षा संघटनांकडून प्रवाशांना पुन्हा वेठीस धरले जाण्याची शक्यता आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 26, 2020 5:13 am

Web Title: rickshaw association demand rs 2 hike in fare zws 70
Next Stories
1 भाजीपाल्याची दुकाने बंद, मात्र मद्यविक्री सुरू
2 Coronavirus Outbreak : नालासोपारा अधिक धोकादायक
3 श्रमिक ट्रेनमध्ये ‘घुसखोरी’
Just Now!
X