नवरंग, काळी घार, बदामी घुबड, मैना, पोपट आदींना फटका

उन्हाच्या तापलेल्या झळा, पाण्याचे दुर्भीक्ष, रस्ते रुंदीकरणासाठी मोठय़ा प्रमाणात झालेली वृक्षतोड आणि लांबलेला पाऊस यामुळे ठाण्यातील नागरिक हवालदिल झालेले असतानाच शहर परिसरातील पक्ष्यांनाही या उकाडय़ाचा यंदा मोठा फटका बसला आहे. गेल्या पंधरा दिवसांमध्ये शहरातील वेगवेगळ्या भागांमध्ये २८ पक्षी जखमी अवस्थेत नागरिकांना सापडले असून उपचार करून त्यांना सोडून देण्यात आले आहे. पाच ते सहा पक्षी या प्रतिकुल परिस्थितीमुळे मृत्युमुखी पडले. ठाण्यातील ‘वाइल्ड लाइफ वेल्फेअर असोसिएशन’ संस्थेने शहरातील जखमी पक्ष्यांसाठी राबवलेल्या बचाव उपक्रमातून ही माहिती समोर आली आहे.

Stray animals suffering from dehydration due to heat 316 complaints in six days in Mumbai and Thane
उष्णतेमुळे भटक्या प्राण्यांना निर्जलीकरणाचा त्रास, मुंबई, ठाण्यामध्ये सहा दिवसांत ३१६ तक्रारी
Birds mumbai, Birds suffer from heat,
मुंबई : वाढत्या उष्म्याचा पक्ष्यांना त्रास, १६ दिवसांमध्ये १०० हून अधिक पक्षी व प्राणी रुग्णालयात दाखल
Tipeshwar Sanctuary
VIDEO : टिपेश्वर अभयारण्यात वाघच नाही, तर रानकुत्र्यांसह ‘या’ वन्यप्राण्यांना पर्यटकांची पसंती
(11 goats died in attack by stray dogs in Jalgaon )
जळगावात मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात ११ बकर्‍या मृत्युमुखी

ठाण्यातील येऊर, वर्तकनगर, घोडबंदर रोड परिसरातील नागरिकांनी दिलेल्या माहितीवरून वाइल्ड लाइफ वेल्फेअर असोसिएशन या संस्थेच्या तरुणांनी गेल्या पंधरा दिवसांमध्ये अत्यवस्थ असलेल्या पक्ष्यांची शुश्रूषा केली. त्यामध्ये नवरंग, काळी घार, बदामी घुबड, मैना, पोपट, बुलबुल अशा पक्ष्यांचा समावेश होता. उन्हाच्या तीव्र झळांमुळे जमिनीवर भोवळ येऊन कोसळणारे पक्षी, कावळा, कुत्रे आणि मांजरांच्या तावडीत सापडून जखमी होतात. काही पक्षी वाढत्या उन्हापासून बचाव करण्यासाठी इमारतीच्या आसऱ्याला येतात आणि अलगदपणे नागरिकांच्या हाती पडतात. अशा पक्ष्यांची संस्थेच्या माध्यमातून सुटका करून त्यांच्यावर उपचार करून त्यांना सुखरूप सोडण्यात आले. काही पक्ष्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. यामध्ये सर्वाधिक फटका इंडियन पिट्टा म्हणजे नवरंग या पक्ष्याला बसला असून चार नवरंग पक्ष्याचे मृतदेह संस्थेच्या दृष्टीस पडले, अशी माहिती पक्षीप्रेमी आदित्य सालेकर याने दिली.

दुदैवी नवरंग

इंडियन पिट्टा अर्थात नवरंग या हिमालय, मध्य भारत आणि पश्चिम घाटात आढळणाऱ्या पक्ष्याचे चार मृतदेह पक्षिमित्रांना आढळून आले. त्यापैकी एका पक्ष्यावर कावळ्यांनी केलेल्या हल्ल्यामुळे त्याचे दोन्ही डोळे फुटले होते. नऊ वेगवेगळ्या रंगांचा हा पक्षी नवरंग म्हणून महाराष्ट्रात ओळखला जातो. सकाळी सहा आणि संध्याकाळी सहा वाजता ओरडण्याच्या त्याच्या सवयीमुळे तामिळनाडूमध्ये या पक्षाला ‘६ ओक्लॉक’ या नावानेही ओळखले जाते. सध्या मुबलक प्रमाणात आढळणारा हा पक्षी याच गतीने नष्ट झाला तर भारतातील त्याचे अस्तित्वही धोक्यात येऊ शकेल.

पक्ष्यांसाठी हेल्पलाइन

ठाणे शहरात जखमी स्वरूपात आढळणाऱ्या पक्ष्यांच्या उपचारासाठी वाइल्ड लाइफ वेल्फेअर संस्था कार्यरत असून जखमी पक्षी आढळल्यास त्यांच्यावर उपचार करण्यासाठी संस्था कार्यरत आहेत. आपल्या परिसरामध्ये असे जखमी पक्षी आढळल्यास ९७५७३२२९०१/०२/०३ या क्रमांकावर संपर्क करून पक्ष्यांसाठी मदत मिळवता येऊ शकेल.