News Flash

मद्यधुंद कारचालकाची सात जणांना धडक

कल्याणमधील मुरबाड रस्त्यावर मद्यधुंद कारचालकाने सहा ते सात जणांना धडक दिली.

कल्याणमधील मुरबाड रस्त्यावर मद्यधुंद कारचालकाने सहा ते सात जणांना धडक दिली. वर्दळीच्या रस्त्यावर ही घटना घडल्याने पादचाऱ्यांनी चालकाला बेदम चोप देऊन पोलिसांच्या स्वाधीन केले. रविवारी रात्री दहा वाजता ही घटना घडली.

रस्त्यावर अचानक घडलेल्या या प्रकारामुळे खळबळ उडाली. मुरबाड रस्त्याने एक तरुण होंडा अ‍ॅकॉर्ड गाडी घेऊन जात होता. मुरबाड रस्त्यावर सतत वाहन, पादचाऱ्यांची वर्दळ असते. मद्यधुंद होऊन हा तरुण गाडी चालवत असल्याने नशेमध्ये त्याचा गाडीवरील ताबा सुटला. गाडी अचानक रस्ता सोडून रस्त्यावरील अन्य वाहने आणि पादचाऱ्यांना धडकून पुढे गेली. या वाहनाच्या धडकेत रस्त्यावरील सहा ते सात जण खाली पडले. काहींना किरकोळ दुखापत झाली.

ही घटना घडताच मद्यधुंद तरुण क्षमा मागण्याचा प्रयत्न करू लागला. पण आजूबाजूच्या पादचारी व वाहन चालकांनी तरुणाला बेदम चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले.

पोलिसांनी तातडीने या तरुणाला वैद्यकीय चाचणी करण्यासाठी पालिका रुग्णालयात नेले. तपासणीनंतर त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल, असे महात्मा फुले पोलिसांनी सांगितले.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 4, 2016 12:02 am

Web Title: road accidents in kalyan
Next Stories
1 एटीएम कार्डाचे क्लोनिंग करून ठाण्यात आठ लाखांची चोरी
2 ठाणे दरोडाप्रकरणी आणखी तिघांना अटक
3 माजी कर्मचाऱ्याचाच कट
Just Now!
X