News Flash

दोन महिन्यांतच रस्ता खराब

एडवण, कोरे दातिवरे, उसरणी, डोंगरे, खार्डी, भादवे, चटाळे आदी गावांचा जिल्ह्य़ाला जोडणारा हा प्रमुख मार्ग आहे.

दांडाखटाळी रस्ता दोन महिन्यांतच रस्ता खराब झाला. ठिकठिकाणी खड्डे पडले, काही ठिकाणी खचला गेला.

पहिल्याच पावसात दांडा-खटाळी रस्त्याची दुरवस्था झाल्याने संताप

सफाळे परिसरातील ग्रामस्थांनी १७ वर्षे खराब दांडाखटाळी रस्त्यावर खडतर प्रवास केला. त्यानंतर गेल्या वर्षी नवीन रस्ता झाला, मात्र सुखद प्रवासाचा आनंद घेताच आला नाही. दोन महिन्यांतच रस्ता खराब झाला. ठिकठिकाणी खड्डे पडले, काही ठिकाणी खचला गेला. ठेकेदारांकडून हा रस्ता पुन्हा बनवून घेऊ न त्याला काळ्या यादीत टाकावे, अशी येथील ग्रामस्थांची मागणी आहे.

एडवण, कोरे दातिवरे, उसरणी, डोंगरे, खार्डी, भादवे, चटाळे आदी गावांचा जिल्ह्य़ाला जोडणारा हा प्रमुख मार्ग आहे. या रस्त्याला २०१६-१७ या आर्थिक वर्षांत नूतनीकरणासाठी प्रशासकीय मान्यता मिळाली. ७० लाख यासाठी मंजूर झाले. निविदेप्रमाणे तो दोन भागांत विभागला गेला. सुमारे २.५ किलोमीटरच्या रस्त्यात ९०० मीटर रस्ता आशुतोष भोईर या ठेकेदारास, तर १६५० मीटर रस्ता मीरा इंटरप्रायझेसला नूतनीकरणासाठी देण्यात आला. नोव्हेंबर २०१७ ला रस्ता काम सुरू झाले व फेब्रुवारी २०१८ मध्ये पूर्ण झाले.काम पूर्ण झाल्याचा दाखलाही जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागामार्फत ठेकेदारांना देण्यात आला. मात्र खड्डेमय झालेला रस्ता अधिकाऱ्यांना दिसलाच नाही. टक्केवारीच्या राजकारणात रस्ता वाहून गेल्याचा आरोप ग्रामस्थ करीत आहेत. खड्डय़ात मुरूम टाकून त्यावरून रोलर फिरवून त्याची डागडुजीचा बनाव ठेकेदारांमार्फत सुरू आहे.

ठिकठिकाणी खड्डे पडले असून काही भाग खचलेला आहे. निकृष्ट दर्जाच्या या कामामुळे ७० लाख पाण्यात गेले आहेत. याबाबतीत कनिष्ट अभियंता एन. नाईक यांना विचारले असता, पाण्याचा निचरा होत नसल्यामुळे हे खड्डे पडल्याचे व काही भाग खारफुटी जागेतून जात असल्याने तो खराब झाल्याचे कारण सांगितले आहे. असे असेल तर रस्त्याचा आराखडा तयार करताना या बाबींची तरतूद त्यात का केली नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

या रस्त्यावरून जाताना त्रास सहन करावा लागत आहे. हा रस्ता नागरिकांचा की अधिकारी ठेकेदारांचा, असा प्रश्न आहे. तो ताबडतोब नव्याने बांधावा व ठेकेदारांना काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी एडवण येथील अरविंद पाटील यांनी केली आहे.

रस्ता खराब असल्यामुळे नाइलाजाने माकुणसारमार्गे जावे लागत होते. हा रस्ता झाल्यामुळे सर्वाना सुखकर मार्ग उपलब्ध झाला होता, परंतु दोन महिन्यातच रस्ता खराब झाला. रस्ता दुरुस्त झाला नाही तर परिणामांना प्रशासन जबाबदार असेल.

–  राणिता गावड, सरपंच, ग्रामपंचायत दांडा खटाळी

पावसाळा असल्यामुळे हा रस्ता तात्पुरता दुरुस्त केला आहे. पावसाळ्यानंतर त्याची ताबडतोब दुरु स्ती केली जाईल. ठेकेदाराने न केल्यास त्यांच्या डिपॉझिटमधून तो करू न घेऊ.

–  एन. ए. नाईक,  कनिष्ठ अभियंता, पंचायत समिती

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 8, 2018 3:40 am

Web Title: road bad in two months
Next Stories
1 महामार्ग बांधताना वाढीव मोबदला नाहीच!
2 मोबाइल चोरणारी ‘फटका गँग’ सक्रिय
3 डहाणूत पर्यटन विकासाचे तीनतेरा
Just Now!
X