22 October 2020

News Flash

रस्ता रुंदीकरण करणारच..

पालिकेच्या हद्दीतील महत्त्वाच्या पोखरण रस्ता क्रमांक एक आणि दोनचे रुंदीकरण सुरू आहे.

जयस्वाल-सिंग यांचा संयुक्त पाहणी दौऱ्यात इशारा

पोखरण मार्गावरील शास्त्रीनगर परिसरात रस्ता रुंदीकरणासाठी आवश्यक सर्वेक्षण करत असताना एका राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याने महापालिका अधिकाऱ्याला मारहाण करण्याचा प्रयत्न केल्याचे तीव्र पडसाद आता उमटू लागले आहेत. या भागातील गुंडपुंडांना जरब निर्माण व्हावी यासाठी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल आणि पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी या भागाचा संयुक्तपणे दौरा केला. कोणी कितीही आडवे आले तरी रस्ता रुंदीकरण होणारच आणि त्यासाठी आवश्यक ती कार्यवाही हाती घेतली जाईल, असा इशारा जयस्वाल यांनी या वेळी दिला.

वर्तकनगर भागातील पोखरण रस्ता क्रमांक एकच्या रुंदीकरणाचे काम पूर्ण होत आले असतानाच महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी पोखरण रस्ता क्रमांक दोन येथील रुंदीकरणाचे कामही हाती घेतले आहे. या रुंदीकरणाच्या कामात अडथळा ठरणारी बांधकामे हटविण्यात येणार आहेत. जयस्वाल आणि परमबीर सिंग या दोघा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सोमवारी सायंकाळी पोखरण रस्ता क्रमांक दोनचा पाहणी दौराही केला. या दौऱ्यादरम्यान आयुक्त जयस्वाल यांनी रुंदीकरणाच्या कामात बाधित ठरणारी बांधकामे व्यापाऱ्यांना स्वत:हून काढण्याच्या सूचना दिल्या आणि त्यासाठी २० एप्रिल अखेरची मुदत दिली आहे.

पालिकेच्या हद्दीतील महत्त्वाच्या पोखरण रस्ता क्रमांक एक आणि दोनचे रुंदीकरण सुरू आहे. या कामात आजवर कोणतेही अडथळे उभे राहिलेले नाहीत. असे असताना शास्त्रीनगर परिसरातील रुंदीकरणासाठी आवश्यक असलेल्या सर्वेक्षणासाठी गेलेल्या महापालिका अधिकाऱ्याला मारहाणीचा प्रयत्न सेनेच्यास्थानिक पदाधिकाऱ्याने केला. या पाश्र्वभूमीवर रस्त्या पाहणी करण्यात आली.   कॅडबरी नाका ते देवदयानगर या रस्त्याची त्यांनी पाहणी केली. त्या वेळी त्यांनी कामाची गती आणि दर्जा याबाबत समाधान व्यक्त करत हा रस्ता १५ जूनपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. शास्त्रीनगर, हत्ती पूल ते लक्ष्मी पार्क या रस्त्याच्या सीमांकनाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे.

या रस्त्याच्या रुंदीकरणाची कारवाई हाती घेण्याच्या सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. दरम्यान, पोखरण रस्ता क्रमांक एक कॅडबरी जंक्शन सेवा रस्त्यावरील होत असलेली वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी जयस्वाल यांनी पोखरण रस्ता क्रमांक दोन कडून पूर्व द्रुतगती मार्गावर जाण्याकरिता पूर्वी बंद केलेली मार्गिका सुरू  करण्याबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा केली. दौऱ्यात अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण, उपआयुक्त अशोक बुरपल्ले उपस्थित होते.

उर्वरित बांधकामे दोन दिवसांत भुईसपाट

ठाणे स्टेशन रोड परिसरातील रस्ता रुंदीकरणात अडथळा ठरणाऱ्या वाढीव अनधिकृत बांधकामांच्या बाबतीत कुठलीही दया न दाखविता दोन दिवसांत ही सर्व बांधकामे निष्कासित करण्याचे आदेश महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी सोमवारी सर्व संबंधित अधिकाऱ्यांना दिले. या रस्त्याच्या कामाची पाहणी आयुक्तांनी नुकतीच केली. या वेळी त्यांच्यासोबत वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त रश्मी करंदीकर यादेखील होत्या. रस्त्याची कामे पूर्ण झाल्यानंतर या भागात कोंडी होऊ नये यासाठी आवश्यक त्या उपाययोजना आखण्यासंबंधी या वेळी चर्चा करण्यात आली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 20, 2016 1:12 am

Web Title: road winding project in thane
टॅग Thane
Next Stories
1 ‘इफ्रेडीन’ निर्मात्या कंपनीचे समभाग घसरले
2 ठाणे, भिवंडी व कल्याणात अधिकृत रेती उपसा पुन्हा सुरू
3 राजन किणे काँग्रेसचे नवे गटनेते
Just Now!
X