News Flash

खोपट येथे ८५ हजारांची घरफोडी

खोपट परिसरातील हंसनगर येथे राहणारा युवक काही कामानिमित्त बाहेरगावी गेला होता

खोपट परिसरातील हंसनगर येथे राहणारा युवक काही कामानिमित्त बाहेरगावी गेला होता. ही संधी साधून चोरटय़ांनी त्याच्या घरातून ८५ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरल्याची घटना घडली आहे. २० ते २४ सप्टेंबर या दरम्यान हा युवक काही कामानिमित्त बाहेरगावी गेला होता. चोरटय़ांनी त्याच्या घराचे कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर घरातील ऐवज चोरून नेला. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पूर्ववैमनस्यातून एकावर चाकूहल्ला

ठाणे – येथील पडवळनगरमधील एका कचराकुंडीजवळ थुंकल्याच्या कारणावरून तसेच जुन्या भांडणाच्या रागातून एकावर चाकू हल्ला झाल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. यातील जखमी सकाळी घराबाहेरील मैदानाजवळून जात असताना तेथील एका कचराकुंडीजवळ थुंकले. त्यामुळे रस्त्यावर थुंकल्याच्या कारणावरून उमेश जुवाटकर याने त्यांच्याशी भांडणास सुरुवात केली. तसेच जुन्या भांडणाचा राग असल्याने त्यांच्यावर चाकूने हल्ला केला. तसेच त्याचे साथीदार हरिष जुवाटकर, सागर शेट्टी व अन्य एकाने त्यांना बांबूने मारहाण केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 26, 2015 1:32 am

Web Title: robbery in thane
टॅग : Robbery,Thane
Next Stories
1 माजी सैनिकाच्या मृत्यूचे गूढ कायम
2 जादूटोण्याच्या नावाखाली महिलेची फसवणूक
3 अमेरिकेतील कलादालनात ठाण्यातील चित्रे
Just Now!
X