News Flash

गस्तीवरील पोलिसांना तरुणांकडून मारहाण

याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. शिवाजीनगर पोलिसांत गुन्हा नोंद केला आहे.

अंबरनाथ पूर्वेला रात्रीच्या वेळी गस्त घालणाऱ्या पोलिसांना तरुणांनी मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. शनिवारी रात्री उशिरा ही घटना घडली असून सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दल आणि कर्तव्यावर असलेल्या पोलिसांना मारहाण केल्याबद्दल या तरुणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मधु मंगेश कर्णिक साहित्य उद्यानासमोर विविध खासगी कंपनीच्या एका टॅक्सीचालकाला काही तरुण मारहाण करत असल्याचे गस्तीवर असलेले पोलीस शिपाई व्ही. बी. गायकवाड आणि त्यांच्या अन्य सहकाऱ्याच्या निदर्शनास आले. या तरुणांना हटकण्याचा प्रयत्न केला असता मारहाण करणाऱ्या आकाश सकट, प्रशांत पवार, जयेश सोनावणे या तरुणांनी तेथून पळ काढला. यात पोलिसांनी जयेश या तरुणाला पकडले व अन्य साथीदारांचा पत्ता विचारला. यावेळी आकाश सकट या तरुणाने मागून येत पोलीस शिपाई गायकवाड यांना लाकडी दांडक्याने मारहाण करण्याचा प्रयत्न केला. आपल्या पालकांनाही न जुमानता त्यांनी पोलिसांना शिवीगाळ करणे सुरूच ठेवले.
दरम्यान, हा सगळा थरार सीसी टीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. अखेर पोलिसांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्याशी संपर्क साधून मदत मागितली. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. शिवाजीनगर पोलिसांत गुन्हा नोंद केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 16, 2015 12:32 am

Web Title: roundup police assaulted by youths
Next Stories
1 ठराव रद्द करण्यासाठी भाजपची तक्रार
2 आधीच एकेरी वाहतूक, त्यात दुचाकी वाहनतळ
3 गणपती मंदिराजवळ लवकरच ज्येष्ठ नागरिक कट्टा
Just Now!
X