ठाणे शहरात सर्व सुविधांनी युक्त अशा अनेक स्वतंत्र वसाहती टाऊनशिपच्या धर्तीवर सध्या विकसित होत आहेत. माजिवडा नाक्याजवळील रुस्तोमजी अ‍ॅक्युरा ही त्यापैकी एक. या प्रकल्पातील ३२ पैकी पाच टॉवर आता उभारण्यात आले असून एका मोठय़ा शहरात एक दुसरे स्वतंत्र शहर असे त्याचे स्वरूप आहे. पर्जन्य जलसंधारण, सौरऊर्जेचा वापर, सांडपाण्याचा पुनर्वापर असे अनेक प्रकल्प सोसायटीत राबविण्यात आले आहेत.

रुस्तोमजी अ‍ॅक्युरा, अर्बेनिया प्रोजेक्ट, माजिवडा, ठाणे (प.)

Citizens object to concreting works at unnecessary places in navi mumbai
नको तेथे काँक्रीट रिते! अनावश्यक ठिकाणी काँक्रीटीकरणाच्या कामांना नागरिकांचा आक्षेप, शहरभर वाहतूककोंडी
illegal building, Kopar Shivsena branch,
डोंबिवलीतील कोपर शिवसेना शाखेजवळ बेकायदा इमारतीचे बांधकाम, व्यापारी गाळे बांधून विक्रीची तयारी
Mata Mahakali Yatra in Chandrapur to Commence on 14 April
१४ एप्रिलपासून माता महाकालीच्या यात्रेला सुरूवात; एक महिना चालणार यात्रा, तयारी पूर्ण
ie think our cities
IE THINC Second Edition: “लवकरच असमानता आणि हवामान बदल ही आपल्या शहरांसमोरची सर्वात मोठी आव्हानं ठरतील!”

ठाणे रेल्वे स्थानकापासून साधारण साडेचार किलोमीटर अंतरावर म्हणजे माजीवडा जंक्शनवर रुस्तोमजी या बांधकाम व्यावसायिकाच्या भव्य गृहप्रकल्पाचे काम वेगाने सुरू आहे. १२७ एकर जागेत असलेल्या प्रकल्पात आकाशाला गवसणी घालणारे सुमारे २५ टॉवर उभे राहात आहेत. आतापर्यंत त्यातील सात-आठ टॉवर उभारण्यात आले आहेत. २००९ मध्ये या गृहप्रकल्पाचे बांधकाम सुरू झाले आहे. प्रत्येकी ३२ मजल्यांचे ३२ टॉवर्स उभारण्यात येणार आहेत. त्यातील पाच टॉवर्सचे काम पूर्ण झाले आहे. केंद्र सरकारने स्मार्ट सिटी योजना हाती घेतली आहे. सिटी स्मार्ट करणाऱ्या स्वायत्त संस्थांना त्यांनी निधीही उपलब्ध करून दिला आहे. सोयीसुविधा देणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांनाही या स्मार्ट सिटी योजनेत काही सवलती देण्यात आल्या आहेत. या स्वनिर्मित छोटय़ाशा शहरातीत सदनिका कोटय़वधी रुपयांच्या असल्या तरी वर्तमान आणि भवितव्यांच्या दृष्टीने अनेक उंची सुविधाही बांधकाम व्यावसायिकांनी उपलब्ध करून दिल्या आहेत. रुस्तमजीलाही ही सवलत मिळाली आहे. कोटय़वधींच्या या सदनिका धारकांना मुद्रांक शुल्कात ५० टक्के सवलत मिळाली आहे.
रुस्तोमजी गृहप्रकल्पातील सुमारे ९५ टक्के काम झालेले रुस्तोमजी अ‍ॅक्युरा नावाचे ३२ मजली टॉवर उभे आहेत. ए, बी, सी, डी अशा चार विंग त्यात आहेत. तर ‘ई’ विंग ११ मजल्यांची आहे. चार विंगसाठी एकच सोसायटी तयार करण्यात आली आहे. त्यात ५१२ सदनिका आहेत. तर ‘ई’ विंगसाठी स्वतंत्र सोसायटी आहे. त्यात ४४ सदनिका आहेत. टू बीएच के, थ्री बीएचके असलेल्या या सदनिका एक ते दोन हजार चौरस फुटांच्या आहेत. डिसेंबर २०१४ मध्ये रहिवाशांनी घराचा ताबा घेतला आहे. सध्या तरी अडीचशे ते ३०० जणांनी सदनिकेचा ताबा घेतला आहे. बहुतेकजण येथे राहण्यास आले असून काहींनी घर भाडय़ाने दिले आहे. बांधकाम व्यावसायिकांच्या दृष्टीने सर्वकाही सुखसुविधा दिल्या आहेत म्हणून ताबा घ्या, असे ते सोसायटीला विनवण्या करीत आहेत. परंतु काही सांगितलेल्या सुविधांची अद्याप पूर्तता न झाल्याने सोसायटीने ताबा घेतलेला नाही. बांधकामाच्या बाबतीत बोलायचे झाले तर इमारतींचे बांधकाम सर्व काही अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने गुणवत्ता राखून करण्यात आले असल्याचे सोसायटीचे अध्यक्ष अरुण घोरपडे यांनी सांगितले.
मिनी सिटीची संकल्पना
वाढत्या शहरांना नागरी सुविधा पुरविण्यात केंद्र आणि राज्य सरकार अपुरे पडू लागल्याने टाऊनशिपच्या धर्तीवर अनेक गृहसंकुले उभी राहू लागली आहेत. त्यात टाऊनशिपमध्ये बांधकाम व्यावसायिकांनी रहिवाशांना पायाभूत सुविधा देणे अपेक्षित आहे. रुस्तोमजी गृहसंकुलाचे कामही मिनी सिटीच्या संकल्पनेवर आधारित सुरू आहे. आकाशाला गवसणी घालणाऱ्या ३२ टॉवरच्या या प्रकल्पात शाळा, वाहतूक व्यवस्था, रुग्णालये, मॉल, करमणुकीची साधने, क्रीडांगणे, सुरक्षा व्यवस्था आदींचा समावेश आहे.
कचऱ्यापासून खतनिर्मिती
कचऱ्याची समस्या ही सर्वत्र दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी जागा मिळणेही मुश्कील झाले आहे. परंतु हा प्रश्न जरी प्रशासकीय यंत्रणेला सतावत असला तरी रुस्तोमजी वसाहतीने हा प्रश्न सोडविला आहे. कचऱ्याची आणखी भर टाकून सरकारी यंत्रणेची डोकेदुखी वाढविण्यापेक्षा ती कमी करण्यासाठी उपाय म्हणून गृहसंकुलात प्रत्येक सदनिका धारकांना दोन कचऱ्याच्या पेटय़ा दिल्या आहेत. एका पेटीत ओला कचरा तर दुसऱ्या पेटीत सुका कचरा टाकण्याची ही संकल्पना रहिवाशांनी उचलून धरली आहे. सुका कचरा जरी बाहेर टाकला जात असला तरी ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून त्यापासून खतनिर्मिती येथे केली जाते. हे खत झाडांच्या वाढीसाठी पोषक ठरले आहे.
या टाऊनशिपमध्ये ३२ टॉवर उभारण्यात येणार असल्याने त्या प्रमाणात सुविधाही लागणार आहेत. सध्या २२ सुरक्षा रक्षक तैनात असून १० सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. आणखी १८ सीसीटीव्हीची गरज आहे. प्रत्येकी तीन मजल्यानंतर अग्निशमन यंत्रणेची सुरक्षाव्यवस्था करण्यात आली आहे. कार्यक्रमांसाठी सभागृह, क्लब हाऊस आहे. योग वर्गही लवकरच सुरू होणार आहे. भव्य उद्यान असून उद्यानात मुलांसाठी खेळीयाड, ज्येष्ठांसाठी विरंगुळा कट्टा त्या स्वरूपात आसनव्यवस्था, सायकल, जॉगिंग ट्रॅकचीही व्यवस्था आहे. बाजारपेठ जरी नसली तरी वृदांवन सोसायटीत अनेक दुकाने असल्याने त्यांच्यामार्फत दैनंदिन लागणाऱ्या वस्तूंचा पुरवठा होत असतो. वृंदावन सोसायटीच्या बसेस १० ते १५ मिनिटांनी असल्याने तसेच रिक्षाही उपलब्ध होत असल्याने वाहतूक व्यवस्थेचा प्रश्न नाही. माजिवडा जंक्शनमध्येच हे संकुल आहे. महामार्ग लागूनच आहे. तेथून एका मार्गावरून नाशिकला तर दुसरा घोडबंदर, तसेच कॅडबरी कंपनीमार्गे मुंबईलाही जाता येते. रुस्तोमजी शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालय, श्रीरंग विद्यालय, रुग्णालये, दवाखाने, पोलीस स्टेशन जवळच आहे. संकुलात सध्या दुकाने नसली तरी शॉिपग मॉलचे काम सुरू असल्याने भविष्यात त्याचीही पूर्तता होणार आहे. बाहेरच्यांसाठी वाहनतळ, मनोरंजनाचे ठिकाण इतर अनेक सुविधा येत्या चार ते पाच वर्षांत येण्याच्या मार्गावर आहेत. सध्या मल्टीलेव्हल वाहनतळाची व्यवस्था करण्यात आली आहे. एका वाहनावर एक वाहन अशी त्याची रचना आहे.

सौरऊर्जा, पर्जन्य जल संवर्धन
पाणी आणि वीज या दैनंदिन जीवनात लागणाऱ्या मूलभूत गरजा आहेत. या समस्यांवर मात करून याबाबतीत काही प्रमाणात स्वयंपूर्ण व्हावे या उद्देशाने वसाहतीत सौरऊर्जा प्रकल्प तसेच पर्जन्य जलसंधारण योजना राबविण्यात आली आहे. सौरऊर्जेपासून निर्माण झालेली वीज संकुलातील सार्वजनिक ठिकाणी असलेल्या वीज उपकरणांसाठी वापरली जाते. तसेच संकलित झालेले पावसाचे पाणी झाडांसाठी वापरले जाते. सांडपाणीही पुनर्वापर करून वापरले जाते.

आता गॅसची प्रतीक्षा
या ३२ मजली संकुलातील ५०० ग्राहकांना टाटा कंपनीने दूरध्वनी सेवा उपलब्ध करून दिली आहे. रुस्तोमजी संकुलाच्या अवतीभोवती म्हणजे वृदांवन, श्रीरंग, माजिवडा परिसरात महानगर गॅस पाइपलाइनची सुविधा आहे. परंतु रुस्तोमजी संकुलात अजूनही ती उपलब्ध होत नाही. सोसायटीने अर्ज, विनंत्या अनेक वेळा केल्या आहेत, करीत आहेत. परंतु त्याबाबतच्या हालचाली म्हणाव्या तशा होत नाहीत.
खेळ, सण आणि उत्सवांची रेलचेल
या मोठय़ा संकुलात खेळ तसेच सण-समारंभासाठी स्वतंत्र जागा उपलब्ध आहे. क्रिकेट, व्हॉलीबॉल, टेनिस या खेळांसाठी कोर्ट तयार केले आहे. क्रिकेट कोर्टला चारही बाजूने जाळी असल्याने टोलवलेल्या चेंडूने खिडक्यांची तावदाने फुटण्याची भीती नाही. त्याचप्रमाणे टेबल टेनिस, कॅरम, बुद्धिबळ आदी क्रीडा प्रकारही येथे उपलब्ध आहेत. तरण तलाव असल्याने पोहण्याच्या आनंदासह शारीरिक व्यायामही येथे मिळतो. अद्ययावत सुविधांनी युक्त व्यायामशाळा आहे.
लीऑन वल्र्ड
या वसाहतीचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे लीऑन वर्ल्ड. बच्चे कंपनीला मनसोक्त बागडता यावे, खेळता खेळता ज्ञानार्जनही करता यावे यासाठी लीऑन वल्र्ड ही चार भिंतीतील संकल्पना येथे यशस्वीपणे राबविण्यात आली आहे. या वास्तूत रंगकाम, संगीत, नृत्य, खेळ, विज्ञान, गणित, वाचनालय, तर्कशास्त्र, ग्रहतारे यांचा आरंभिक अभ्यास लहान मुले हसतखेळत करतात. येथे मुलांना खेळायला, बागडायला मैदान आहे. पाळणाघरही येथे आहे.
suhas.dhuri@expressindia.com