News Flash

सचिन तेंडुलकरनं वाहिली कल्याणकर क्रिकेटपटूला श्रद्धांजली

विजय शिर्के यांचं करोनामुळे निधन

सचिन तेंडुलकरनं वाहिली कल्याणकर क्रिकेटपटूला श्रद्धांजली

मुंबईकडून स्थानिक क्रिकेट खेळलेले माजी क्रिकेटपटू आणि सचिन तेंडुलकरचे जवळचे मित्र विजय शिर्के यांचं करोना विषाणूमुळे निधन झालं आहे. त्यांच्यावर ठाण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. विजय शिर्के हे ८० च्या दशकात मुंबईकडून सचिन आणि विनोद कांबळी यांच्यासोबत खेळायचे. आपल्या जवळच्या मित्राच्या निधनाने भावूक झालेल्या सचिनने ट्विटरवरुन त्याला श्रद्धांजली वाहिली आहे.

शिर्के यांच्या निधनामुळे मुंबई क्रिकेटला मोठा धक्का बसल्याची भावना बोलून दाखवली जात आहे. काही वर्षांपूर्वी विजय शिर्के हे मुंबईवरुन ठाण्यात स्थायिक झाले होते. काही दिवसांपूर्वी त्यांना करोनाची लागण झाल्यानंतर त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. या उपचादादरम्यानच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

MCA च्या १७ वर्षाखालील उन्हाळी शिबीरांत दोन वर्ष शिर्के यांनी प्रशिक्षक म्हणून काम पाहिलं होतं. मुंबई आणि स्थानिक क्लब क्रिकेटमध्ये खेळताना विजय शिर्के नव्या चेंडूवर शानदान गोलंदाजी करायचे. त्यांच्याकडे चेंडू स्विंग करण्याची नैसर्गिक शैली होती. त्यांच्या निधनामुळे मुंबई क्रिकेटने एका चांगल्या खेळाडूला गमावल्याची भावना मान्यवरांनी व्यक्त केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 21, 2020 12:31 pm

Web Title: sachin tendulkar close friend and ex mumbai cricketer vijay shirke dies due to covid 19 psd 91
Next Stories
1 पृथ्वीची निवडच व्हायला नको होती, तो ऑस्ट्रेलियन माऱ्याचा सामना करण्यासाठी तयार नव्हता !
2 फोन बंद करा, संघ म्हणून एकत्र या आणि पुढचा विचार करा ! मोहम्मद कैफचा भारतीय संघाला सल्ला
3 खराब कामगिरीनंतर चहुबाजूंनी टीका होत असताना पृथ्वी शॉचा सूचक संदेश, म्हणाला…
Just Now!
X