|| विशाखा कुलकर्णी

वसईची ओळख ही कला आणि संस्कृतीचे शहर अशी आहे. या शहराच्या सांस्कृतिक जडणघडणीत ज्या समाजाचा मोठा वाटा आहे तो म्हणजे सामवेदी ब्राह्मण समाज. पोर्तुगिजांच्या आRमणानंतरही या समाजाने आपले अस्तिव टिकवून वसईच्या गौरवशाली इतिहासात योगदाने दिले आहे. वसईच्या जेमतेम बारा गावात वसलेला हा समाज. हा समाज वसईत कुठून आला, तो कसा स्थिरावाल त्याची ही ओळख.

Husband Appreciation Day
Husband Appreciation Day : महिलांनो, नवऱ्याला गृहीत धरता का? त्यांच्या पाठीवर कधी देणार कौतुकाची थाप?
caste politics in uttarakhand
ब्राह्मण ते ठाकूर, दलित ते मुस्लिम; उत्तराखंडमध्ये जातीय समीकरणावरच निकालाचे गणित
lokrang
गीतांचा भीमसागर…: चळवळीची गाणी…
Dram Hridayangam picture and biography of village culturea
नाट्यरंग: ‘मुक्काम पोस्ट आडगाव’; ग्रामसंस्कृतीचं हृदयंगम चित्र आणि चरित्र

अनेक विचारांचे एका प्रदेशातील, एका धर्माची, भाषेची माणसे एकत्र येऊन समाज बनतो पण या समाजाला एका धाग्यात बांधून ठेवायचे काम हे संस्कृती करते. कुठल्याही समाजाने जपलेली, एका पिढीकडून दुसर्?या पिढीकडे सहजपणे जाणारी ही संस्कृतीच त्या समाजाची ओळख बनते भारतासारख्या विविध समाज एकत्र नांदणारम्य़ा प्रदेशातली संस्कृती जपणे म्हणजे समाजाची ओळख जपणे ठरते. असे वैविध्यपूर्ण समाज एकत्र राहणारम्य़ा ऐतिहासिक शहर म्हणजे वसई! याचे उदाहरण हिंदू मुस्लिम आणि ख्रिस्ती समाज एकत्र एकोप्याने नांदत असल्याने कायम दिले जाते. वसई येथे वेगवेगळ्या निमित्ताने विविध संस्कृती रुजल्या, वाढल्या आणि आज देखील टिकून आहेत. वसईत भंडारी, कोळी, वाडवळ अशा अनेक समाजांसह सामवेदी कुपारी हा समाज सुद्धा स्वतंत्र ओळख आणि संस्कृती टिकवून आहे. या भागापासून आपण वसईच्या सामवेदी कुपारी समाजाची ओळख करून घेणार आहोत.

नावाप्रमाणेच सामवेदी समाज हा ऋग्वेद, यजुर्वेद,सामवेद आणि अथर्ववेद या चार वेदांपैकी असलेल्या सामवेदातील अनेक शाखांमधील एक आहे. या वेदांमध्ये गायना विषयी विविधा अंगांनी मार्गदर्शन केले आहे. सामवेदाचे अनुसरण करणारा हा समाज प्राचीन काळापासून यज्ञ विधींमध्ये ऋग्वेदातील ऋचा यांचे गायन करत आला आहे. त्यामुळे हा समाज गायक समाज म्हणून देखील ओळखला जातो. पोर्तुगीजांनी १७३९ मध्ये वसई जिंकल्यानंतर येथे मोठय़ा प्रमाणावर धर्मांतर होऊन सामवेदी ब्राह्मण समाजातील बहुतांश लोक ख्रिस्ती झाले. आणि त्यांची ओळख सामवेदी ख्रिस्ती अशीही झाली. काशीच्या असलेल्या सामवेदी समाजाचे भारतभर स्थलांतर झाले.स्थलांतरित झालेला हा समाज हळूहळू वसईला देखील स्थिरावला.

वसई प्रांतात असलेले हे सामवेदी जैमिनीय शाखेतील नित्यांजल उपशाखेत असल्याचे म्हटले जाते. या समाजाविषयीच्या अनेक आख्यायिका आहेत त्यानुसार व्यासमुनी यांचे शिष्य जैमिनी ऋषी हे सामवेदी ब्राह्मण समाजाचे गुरु आहेत. ते नित्यांजनी शाखेतील असून पंचवटी बेटावरून अर्नाळा बेटावर आले. एके ठिकाणी असा उल्लेख सापडतो की ते भगवान परशुरामांच्या आईचा रेणुकादेवीचे उत्तरकार्यासाठी ब्राह्मणाच्या शोधात होते, तेव्हा त्यांना कळले की या भागात काही ब्राह्मण आहेत. ऋषी त्यांच्याकडे गेले आणि उत्तरRिया करून घेतली. त्या बदल्यात या ब्राह्मणांचे लग्न देवाश्रय नावाच्या ऋषींच्या तेरा कन्यां सोबत लावून दिले आणि वसई मध्ये त्यांना वास्तव्यासाठी जमीन उपलब्ध करून दिली. अशी ती आख्यायिका.

एखाद्य समाजाच्या बाबतीत अशा अनेक आख्यायिका असतात तसेच समाजातही आणखी काही आख्यायिका आहे ,त्यानुसार सामवेदी हा शब्द संस्कृत शब्द शामनीद्रेश पासून घेतला गेला या शब्दाचा अर्थ राजाच्या पदरी गायन सेवा देणारे असा होतो. अशा लोकांना पूर्वी राजदरबारी नेमले जात असे. यांना समाधी किंवा शामेडी असेही म्हणत. अशा प्रकारे संगीताशी थेट निगडित असलेला हा समाज आपली संगीतातील अभिरुची आजही टिकवून आहे आजही अनेक नाटय़ मंडळे, गायन मंडळे यांच्या माध्यमातून गायनाची ही पाष्टद्धr(२२८र्)भूमी जपली जाते असे सामवेदी समाजातील एक नेते कमलाकर पाटील सांगतात. आणखी एका अख्यायिकेनुसार सामवेदी समाजातील लोक वसईमध्ये ओरिसाहून आले.

अशा विविधी आख्यायिका समाजाविषयी असल्या, तरी यातली नेमकी खरी कोणती हे सांगता येणे कठीणच.पण या समाजाचा वसईच्या सांस्कृतिक घडणीमध्ये सामवेदी समाजाचा महत्वाचा वाटा आहे हे मात्र तितकेच खरे आहे. वसईतील या समाजाची लोकसंख्या सुमारे पन्नास हजार आहे, या लोकांची वसईतील बारा गावांमध्ये प्रामुख्याने वस्ती आहे. असे असले तरी हा समाज एकोप्याने नंदणारा आहे. आपल्या संस्कृतीमधील प्रथा परंपरा जपत बारा गावांपैकी एकाही गावात कुणाला काही गरज भासल्यास समाजातील सर्व लोक एकत्र येतात. या समाजाने कालानुरूप

परंपरागत असलेला शेतीचा व्यवसाय सोडून आता वेगवेगळे नोकरी- व्यवसाय सुरू केले आहेत. पूर्वी अगदी शंभर टक्के समाज शेती या प्रमुख व्यवसायावर अवलंबून होता, पण आता जेमतेम वीस टक्के लोक शेती करतात तर बाकी लोक इतर विविध व्यवसायांमध्ये गुंतले

आहेत. असे असले तरी आपल्या समाजाची कदोडी ही भाषा, आपल्या परंपरा, राहणीमान आजही जपले आहे, याची साक्ष या समाजातील माणसे, तरुण पिढी देतातच, सोबत या समाजाची माहिती संकलित करून, ती डिजिटल माध्यमांवर प्रकाशित करून पुढे जात राहील याचीही व्यवस्था आजच्या पिढीने केलेली दिसते, शेवटी संस्कृती जपणे म्हणजे वेगळे तरी काय हो? जोर जबरदस्तीने आपल्या परंपरा लादण्यापेक्षा कालानुरूप पुढे जाते तीच संस्कृती खऱ्या अर्थाने टिकते हेच खरे!

vishu199822@gmail.com