01 October 2020

News Flash

धरणांच्या पाणीसाठय़ात समाधानकारक वाढ

पेल्हार धरण तुडुंब, तर धामणी, उसगाव धरणांमध्ये निम्मा जलसाठा

पेल्हार धरण तुडुंब, तर धामणी, उसगाव धरणांमध्ये निम्मा जलसाठा

वसई : मागील दोन दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसांमुळे वसई-विरार शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणीसाठय़ात समाधानकारक वाढ झाली आहे. पेल्हार धरण हे भरून वाहू लागले आहे. मात्र धामणी धरण ६१ टक्के आणि उसगाव धरण केवळ ५५ टक्के भरले आहे.

वसई-विरार शहराला सूर्या पाणी प्रकल्पाअंतर्गत धामणी धरणातून दररोज २०० दशलक्ष लिटर, पेल्हार मधून १० दशलक्ष लिटर आणि उसगाव धरणातून २० दशलक्ष लिटर पाणी पुरवठा गेला जातो. जुलै महिन्यात पावसाने दडी मारल्याने धरणाच्या पाण्याची पातळी खालावली होती. मात्र सोमवारपासून सुरू असलेल्या पावसाने धरणांच्या साठय़ात समाधानकारक वाढ झाली आहे.

धामणी धरणात १६८.९४ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा जमा झाला असून हे धरण ६१.१३ टक्के भरले आहे. मागील वर्षी हे धरण याच दिवशी ९० टक्के भरले होते. उसगाव धरण मागील वर्षी याच दिवशी (६ ऑगस्ट) भरून वाहत होते. मात्र हे धरण केवळ ५५.६६ टक्के भरले आहे.  विशेष म्हणजे मागील दोन दिवसात धरण्याच्या पाणीसाठय़ात २० टक्के वाढ झाली आहे. उसगाव धरणाता २.७६१ दशलक्ष घनमीटर एवढा पाणीसाठा जमा झाला आहे.

इतर दोन महत्त्वाच्या धरणांमधील पाणीसाठा समाधानकारक नसला तरी पेल्हार धरणाने दिलासा दिला आहे. हे धरण पूर्णपणे भरले. धरणाची क्षमता ३.५६ दशलक्ष घनमीटर एवढी असून ते १०० टक्के भरले आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिला तर येत्या काही दिवसात दोन्ही धरणे पूर्ण भरतील असा विश्वास पालिकेने व्यक्त केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 7, 2020 12:15 am

Web Title: satisfactory increase in dam water level due to heavy rain zws 70
Next Stories
1 वादळात सापडलेल्या मच्छीमारांची सुखरूप सुटका
2 उघडय़ा नाल्यात पडून तरुणाचा मृत्यू
3 पावसाची संततधार कायम
Just Now!
X