17 January 2021

News Flash

रिक्षाचालकाकडून शालेय विद्यार्थिनीचा विनयभंग

वसई पोलीस ठाण्यात या प्रकरणी अज्ञात रिक्षाचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रतिनिधिक छायाचित्र

वसई : रिक्षाचालकाने एका शाळकरी मुलीचा रिक्षात विनयभंग केल्याची घटना वसईतील भुईगाव परिसरात घडली आहे. वसई पोलीस ठाण्यात या प्रकरणी अज्ञात रिक्षाचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भुईगाव डोंगरी परिसरात राहणारी १६ वर्षांची पीडित मुलगी बुधवारी संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास खाजगी शिकवणी वर्गाल जात होती. वाटेत एक रिक्षा तिने थांबवली. रिक्षाचालकाने काही अंतर गेल्यावर निर्जन जागेवर रिक्षा थांबवली. मागे येऊन तो या मुलीशी लगट करू लागला.

या प्रकाराने मुलगी घाबरली आणि तिने त्याला ढकलून रिक्षातून पळ काढून घर गाठले. या प्रकाराने या मुलीला मानसिक धक्का बसला असून तिच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

वसई पोलीस ठाण्यात या प्रकरणी विनयभंग आणि पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल असून पोलीस या रिक्षाचालकाचा शोध घेत आहे. या प्रकाराने परिसरातील पालकांत घबराट पसरली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 6, 2018 2:21 am

Web Title: school girl molestation from rickshaw driver
Next Stories
1 प्लास्टिकबंदीमुळे वृत्तपत्रांच्या रद्दीला ‘भाव’
2 संतुलित आहार हीच सुदृढ आरोग्याची गुरुकिल्ली..
3 डोक्यावर हातोडीने प्रहार करुन पत्नीची हत्या, मेहुणीला ऑडिओ क्लिप पाठवून दिली कबुली
Just Now!
X